....तर राज ठाकरे मराठा आंदोलनाचं नेतृत्त्व करणार?

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने मराठा समाजातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील नेते, विद्यार्थी मुंबईत आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत निर्णय झाला नाही, तर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णयही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट …

maratha medical exam, ….तर राज ठाकरे मराठा आंदोलनाचं नेतृत्त्व करणार?

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने मराठा समाजातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील नेते, विद्यार्थी मुंबईत आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत निर्णय झाला नाही, तर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णयही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, त्या भेटीत तोडगा निघाला नाही, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मराठा समाजातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या भेटीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ जमले आहेत. वैद्यकीय संचालकांची भेट घेऊन 11 वाजता मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. जर मुख्य मंत्र्यांच्या भेटीत निर्णय झाला नाही तर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे .

तसेच, आज 11 ते 1 च्या दरम्यान राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले जाणार आहेत.

राज ठाकरे नेतृत्त्व करणार?

मराठा समाजातील विद्यार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची भेटीत काहीच तोडगा निघाला नाही, तर हे विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची भेट घेतल्यास, या भेटीत काय होतं, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करणार का किंवा त्यांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडणार का, हे येत्या काळात कळेलच.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात 50 हून अधिक मोर्चे अगदी शांततेत निघाले. प्रचंड मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं. 30 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येणार नाही.

मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटीफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांचे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *