AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं

वरळी कोळीवाड्यातील काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. (Worli koliwada localite shifted) इथे आतापर्यंत १० कोरोना रुग्ण आढळलेत.

वरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं
| Updated on: Apr 01, 2020 | 5:07 PM
Share

मुंबई : वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे एक-दोन नव्हे तर तब्बल 10 पॉझिटिव्ह (Worli koliwada localite shifted) रुग्ण आढळल्यानंतर, प्रशासनाने आणखी खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच वरळी कोळीवाड्यातील काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. वरळी कोळीवड्यात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने, त्यांच्या संपर्कात आलेल्या 108 जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काल रात्री 108 रहिवाशांची यादी तयार केली आहे. या सर्वांना नजीकच्या पोदार रुग्णालयात नेण्यात येणार आहे.(Worli koliwada localite shifted)

आज सकाळी 10 वाजता या सर्वांना पोदार रुग्णालयात हलवण्यात येणार होतं. पण त्या कारवाईला दुपारनंतर सुरुवात झाली. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एक बेस्ट बस वरळी कोळीवड्यात नेण्यात आली. त्या बसमधून टप्प्याटप्प्याने या रहिवाशांना नेलं जाणार आहे. पण काही रहिवाशी जाण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी या रहिवाशांची समजूत काढली. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आलं आहे.

कोळीवाड्यात कर्फ्यू

वरळी कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरात एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून इथे कर्फ्यू लावण्यात आल्याने, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे.

आदर्शनगरमध्ये एका इमारतीतील एक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या दाम्पत्याला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मुंबईतील 147 ठिकाणं सील

बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील (Corona Mumbai 147 place seal) करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होम क्वारंटाईमधील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

मुंबईत आज (31 मार्च) कोरोनाचे नव्या 59 रुग्णांची नोंद (Corona Mumbai 147 place seal) झाली. तर सोमवारी 47 रुग्ण सापडले. या रुग्णांमध्ये 6 एप्रिलपर्यंत अशाचप्रकारे वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे झोपडपट्ट्या आणि चाळींमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले.

संबंधित बातम्या 

वरळीत कोरोनाचे 5 संशयित रुग्ण, कोळीवाडा सील, कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव

 मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण, खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून  

देशात ‘कोरोना’चे रुग्ण 16 दिवसात 16 पट, बारा तासात 240 कोरोनाग्रस्तांची वाढ

जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा : अजित पवार

कोल्हापूरकरांची नेटकी तयारी, शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्यासाठी चाचपणी

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.