AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्र्यांच्या दहशतीने दहा शाळांना टाळे, मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ, कुठे घडला हा प्रकार

हिंसक कुत्र्यांच्या हल्ल्याचे व्हिडीओ पाहून आता सर्वत्र त्यांची दहशत पसरली आहे. आता एका जिल्ह्यात कुत्र्यांच्या दहशतीने शाळा बंद ठेवून ऑनलाईन शाळा सुरु केल्या आहेत.

कुत्र्यांच्या दहशतीने दहा शाळांना टाळे, मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची वेळ, कुठे घडला हा प्रकार
dog attack (
| Updated on: Aug 20, 2026 | 9:14 PM
Share

उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यातील नारायणबगड येथे कुत्र्यांच्या दहशतीने १० शाळांना बंद करण्याची नौबत प्रशासनावर आली आहे.येथे आता मुलांचे वर्ग आता ऑनलाईन घेतले जात आहेत. कुत्र्यांनी या भागात आतापर्यंत ११ जणांना चावा घेतल्याने लोक घरातून बाहेर पडताना काठी घेऊनच बाहेर पडत आहेत.त्यामुळे या ठिकाणी ६०० हुन अधिक मुलांचे शिक्षण आता ऑनलाईन करण्याची वेळ आली आहे. कुत्र्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाची मदत घेतली जात आहे.

उत्तराखंडात चमोली जिल्ह्यातील नारायणबगड भागात कुत्रांनी चावा घेतल्याने ११ जणांना रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घेण्याची वेळ आली आहे. या भागातील भटक्या कुत्र्यांनी लोकांना इतके दहशती खाली टाकले आहे की लहान मुलांना शाळेत पाठवणे लोकांनी बंद केले आहे.या गावातील लोक घराबाहेर पडताना मोठी काठी घेऊन बाहेर पडत आहेत. या चमोलीचे कलेक्टर गौरव कुमार याच्या आदेशाने मुख्य शिक्षण अधिकारी आकाश सारस्वत यांनी शाळांना सुट्टी देणारा आदेश काढला आहे. आधी २० ते १३ ऑगस्ट असे चार दिवस शाळांना बंद ठेवण्याचा आदेश काढला होता. आता ही सुट्टी घटवून दोन दिवस करण्यात आली आहे. हिंसक आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आता वन विभागाने क्विक रिस्पॉन्स टीमची मोहिम सुरु केली आहे. आता पर्यंत या टीमने तीन कुत्र्यांना पकडले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एका पिसाळलेल्या कुत्र्याने अन्य कुत्र्यांना चावल्याने या क्षेत्रातील अनेक कुत्री पिसाळली आहेत.ज्यानंतर या भागातील अनेक कुत्रे आक्रमक झाल्याचे म्हटले जाते. या दाव्याला दुजोरा मात्र मिळालेला नाही.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार रविवार आणि सोमवारी तीन लोकांवर कुत्र्यांनी हल्ला केला. मंगळवारी कुत्र्यांनी शाळकरी मुलांसह चार लोकांचा चावा घेतला. बुधवारी तीन शाळकरी मुलांसह चार अन्य लोकांवर हल्ला करण्यात आला. काल जमखी झालेल्या दीपांशु बिष्ट, मानवी, वैष्णवी, मजदूर प्रकाश आणि पंती गावाचे रहिवासी लक्ष्मी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना येथे एण्टी रेबिजचे इंजेक्शन देण्यात आले आहेत.

देशात ही दुसरी घटना आहे की कुत्र्यांच्या उपद्रवाने शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याआधी जम्मू-कश्मीरातील राजौरीत कुत्र्यांच्या दहशतीने ८ पंचायतीच्या शाळांना एक दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. तेथे लोकांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या टीमला तैनात करण्यात आले होते.

कुत्रे का होत आहेत हिंसक ?

रस्त्यावरील कुत्र्यांना बाईकस्वार किंवा वाहनचालक जखमी करतात त्यामुळे ते हिंसक झालेले असतात. मेटिंग आणि प्रजननाच्यावेळी देखील कुत्री हिंसक झालेली असतात. रस्त्यावरील कुत्र्यांना पाळीव कुत्र्यांप्रमाणे शांत करता येत नाही. त्यामुळे अनेक शहरात कुत्रे मानवावर हल्ले करताना दिसत आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात