निवडणुकीपूर्वीच छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या जंगलात ठो ठो… 11 नक्षलवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली पोलिसांचे सतर्कतेचे आदेश

छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील जंगलात एकूण 11 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पहाटेपासून या नक्षलवाद्यांशी चकमक सुरू होती. छत्तीसगडमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. गडचिरोलीतही नक्षलवाद्यांचा कँम्प उद्ध्वस्त करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ही चकमक झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणुकीपूर्वीच छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या जंगलात ठो ठो... 11 नक्षलवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली पोलिसांचे सतर्कतेचे आदेश
जंगलात ठो..ठो, नक्षलवाद्यांचा खात्माImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 2:44 PM

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाने केलेल्या एन्काऊंटरमध्ये 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मध्यप्रदेशातील बालाघाटमध्येही दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने आतापर्यंत 11 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.

बस्तर रेंजचे पोलीस महासंचालक सुंदरराज पी यांनी या चकमकीची माहिती दिली आहे. ही चकमक साधारण पहाटे 6 वाजल्यापासून सुरू झाली. गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंड्रा गावाजवळील जंगलात ही चकमक उडाली. सुरक्षा दलाची एक संयुक्त टीम नक्षल विरोधी मोहिमेवर गेले असता ही चकमक उडाली, अशी माहिती सुंदरराज पी यांनी दिली.

चकमक सुरूच

जिल्हा रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्क फोर्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कमांडो बटायलियन फॉर रेझ्युलेट अॅक्शनची टीमने ही मोहीम फत्ते केली. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच लाइट मशीन गन आणि शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. गंगालूर पोलीस ठाण्याच्या कोरचोली आणि लेंड्राच्या जंगलात अजूनही चकमक सुरू आहे.

मध्यप्रदेशातही दोघे ठार

बिजापूर जिल्हा बस्तर लोकसभा क्षेत्राच्या अंतर्गत येतो. या ठिकाणी 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने या भागात नक्षलविरोधी अभियान वेगाने सुरू केलं आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात पोलीस आणि दोन नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात हे दोन्ही नक्षलवादी मारले गेले. या नक्षलवाद्यांवर बक्षीस ठेवण्यात आलं होतं.

तासभर ठो ठो

मध्यप्रदेशातील केराझारी वन क्षेत्रात सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हा गोळीबार झाला. त्यानंतर पोलिसांनी या भागाची छाननी केली अन् दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. संजती ऊर्फ क्रांती आणि रघू ऊर्फ शेर सिंह असं या दोन नक्षलवाद्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून एक एके-47 रायफल, एक 12 बोर रायफलसहीत अन्य गोष्टी हस्तगत करण्यात आल्या. या परिसरात मोहीम सुरू आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा कँम्प उद्ध्वस्त

दरम्यान, गडचिरोलीतही नक्षलविरोधी पोलीस पथकाने नक्षलवाद्यांचा कँम्प उद्ध्वस्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घटना घडवण्यासाठी नक्षलवादी कसनसुर भागात चातगाव दलम जंगलात ठिय्या मांडून होते. याची गुप्त माहिती घेत गडचिरोली पोलीस आणि सी.सिक्स्टीचा कोंबिंग ऑपरेशन काल दिवसभर चालला. आज या नक्षलवाद्यांच्या कॅम्पचा पत्ता लावून पोलिसांनी नक्षल कॅम्प उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणात नक्षलवाल्यांचे साहित्य जप्त केले.

सध्या गडचिरोली जिल्ह्यात पहिला टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असून गडचिरोली पोलिसां मार्फत अनेक दिवसांपासून जंगलात कोबिंग ऑपरेशन सुरू आहे. या आपरेशन मुख्य नेतृत्व गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोल्पत करीत आहेत. दरम्यान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील चकमकीनंतर गडचिरोली पोलिसांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.