AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्नितांडव… इमारतीला आग लागल्याने 14 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी इमारतीवरुन उड्या मारल्या

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका इमारतीतील कोचिंग सेंटरला आग लागल्याने त्यात १४ तरुणांचा मृ्त्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

अग्नितांडव... इमारतीला आग लागल्याने 14 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी इमारतीवरुन उड्या मारल्या
Lucknow Fire
| Updated on: Jun 22, 2026 | 8:25 PM
Share

उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलिगंज येथे सोमवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्याने या घटनेची दाहकता वाढली आहे. या विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय २० ते २४ वर्षांचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात  आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आगल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

उत्तर प्रदेशाच्या लखनऊमध्ये अलिंगज येथील एका इमारतील एनिमेशन सेंटर गेमिंग झोन, पेट शॉप आणि कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची घटना दुपारी घडली. या आगीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी इमारतीवरुन उड्या मारल्या. या दुर्घटनेत १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खिडक्यातून उड्या मारल्याचे भयानक दृश्य येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. लखनऊ येथील जुन्या अलीगंज भागातील पुर्णिया येथील दुर्घटना घडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट –

राजधानी लखनऊ येथील अलिगंज स्थित येथील पुर्निया भागात सोमवारी एका इमारतीला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या इमारतीला अचानक आग लागल्याने इमारती ज्वाला आणि धुराचे लोट उटले त्यामुळे मोठा अफरातफर माजली. लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडकी आणि जागा मिळून तेथून उड्या मारल्याने अनेकांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला ही घटना कोचिंग सेंटर आणि लायब्ररीत घडल्याचे म्हटले जात होता. मात्रनंतर पोलिसांनी सांगितले की इमारतीत कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. तळमजल्यावर पेट शॉप होते. तर वरच्या मजल्यावर गेमिंग झोन संचालित होते. येथे कर्मचारी गेमिंग सॉफ्टवेअरवर काम करत होते.

इमारतीला उडी मारली

आग लागल्यानंतर वरच्या मजल्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली. काही लोक बाथरुममध्ये अडकल्याचे म्हटले जात आहे. नंतर अनेक लोकांना अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकाने लोकांना बाहेर काढले. स्थानिक लोकांनी देखील मदतकार्यात हातभार लावला. काही लोक इमारतीच्या छतावर तर काही अन्य भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागले. एका विद्यार्थ्याने जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या वरुन उडी मारल्याने जो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा