PM Modi in Pune: पुणेकरांच्या सेवेत 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ताफ्याचे लोकार्पण

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाला डिझेलची वाढ टाळण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

PM Modi in Pune: पुणेकरांच्या सेवेत 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ताफ्याचे लोकार्पण
पुणेकरांच्या सेवेत 150 इलेक्ट्रिक बसेस दाखलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 5:21 PM

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या(Prime Minister Narendra Modi) हस्ते आज सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी 150 इलेक्ट्रिक बसेसच्या (Electric buses) ताफ्याचे लोकार्पण व बाणेरमध्ये(Baner) अत्याधुनिक ई-बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनचे   उद्घाटन केले . मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड( MEIL) याची उपकंपनी असलेल्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने उत्पादित केलेल्या 150 ई- बसेसला हिरवा झेंडा दाखवत त्याचे आभासी पद्धतीने उदघाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाला डिझेलची वाढ टाळण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचे काम करणारी अग्रेसर कंपनी

“पुणे शहरातील इलेक्ट्रिक बसेसच्या सध्याच्या 150 बसेसच्या ताफ्यात आणखी 150 ताफ्याचा समावेश करताना ऑलेक्ट्राला अभिमान वाटत आहे. प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी ऑलेक्ट्रा आपल्या प्रयत्नांसाठी कटिबद्ध आहे. इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक प्रणालीद्वारे ध्वनी प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही मत सीएमडी के व्ही प्रदीप यांनी व्यक्त केले आहे. हैदराबादस्थित मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडने ( MEIL) एमईआयएल ही हैदराबाद येथील कंपनी झोझिला बोगद्याचं बांधकाम करत आहे. हा भारतातील मोठा पायाभूत सुविधांचा प्रकल्प आहे. या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील प्रमुख कंपन्यांमधील ही एक कंपनी आहे. जगातील 10 देशांमध्ये कंपनीचे आपलं जाळे विस्तारले आहे.

बसेसची वैशिष्ट्ये

बसेसची लांबी 12-मीटर आहे आणि वातानुकूलित वाहनांमध्ये 33 पेक्षा जास्त लोक बसू शकतात. बसमध्ये बसवण्यात आलेली लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी एका चार्जवर सुमारे 200 किमी पर्यंतचा प्रवास करू शकते . हाय-पॉवर एसी आणि डीसी चार्जिंग सिस्टम 3-4 तासांमध्ये बॅटरी रिचार्ज करण्यास सक्षम आहे. याबरोबरच बसेसमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशन, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बटणे यांचा समावेश आहे.

स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा, धाडसीवृत्ती वाढवा, मोदींचं विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच; वाचा 8 मुद्दे

Gondia Accident | गोंदिया जिल्ह्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

VIDEO: आणि मोदी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून हसले, गप्पाही रंगल्या

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.