आधी आदिवासी मुलीवर बलात्कार, तीन महिन्यांनी जामिनावर सुटल्यावर विधवेवर बलात्कार, मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना

मध्यप्रदेशाच्या रायसेन जिल्ह्यात एका नराधमाने 35 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे (35 year old Widow raped in Madhya Pradesh)

आधी आदिवासी मुलीवर बलात्कार, तीन महिन्यांनी जामिनावर सुटल्यावर विधवेवर बलात्कार, मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना
प्रातिनिधिक फोटो

भोपाळ : मध्यप्रदेशाच्या रायसेन जिल्ह्यात एका नराधमाने 35 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपीवर याआधी देखील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. तो महिन्याभरापूर्वी जामिनावर सुटला होता. मात्र, त्याने पुन्हा बलात्काराचं कृत्य केलं आहे. याप्रकरणी पीडित विधवा महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या (35 year old Widow raped in Madhya Pradesh).

पीडित महिला सांची येथील सलामतपूर पोलीस ठाणे हद्दीत एका गावात एकटीच राहते. तिच्या पतीचं निधन झालं आहे. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी रविवारी (3 जानेवारी) रात्री साडेअकरा वाजता जबरदस्ती पीडितेच्या घरात घुसला. त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडित महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केली. पीडित महिला जवळपास तीन तास आक्रोश करत होती. मात्र, कुणीही तिला वाचण्यासाठी पुढे आलं नाही, अशी तक्रार पीडित महिलेने केली.

पीडितेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या. हा आरोपी मध्यप्रदेश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कलम 376 (2 एन), 450, 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला (35 year old Widow raped in Madhya Pradesh).

या प्रकरणाबाबत उपनिरीक्षक संगीता काजले यांनी प्रतिक्रिया दिली. “आरोपीचं नाव हरिकिशन आहे. तो एक महिन्यापूर्वीच जामिनावर जेलमधून बाहेर सुटला होता. त्याच्याविरोधात सलामतपूर पोलीस ठाण्यात एका आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी तो तीन महिने जेलमध्ये होता”, अशी प्रतिक्रिया संगीता काजले यांनी दिली.

संबंधित बातमी : 3 वर्षीय चिमुरडीचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI