गोव्यात 40 ते 45 लाख पर्यटक दाखल, बागा, कलंगुट, मिरामार बीच हाऊसफुल्ल

| Updated on: Dec 31, 2020 | 3:41 PM

गोव्यातल्या प्रमुख बीचवर असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टीजची तयारी आता पूर्ण झाली आहे. | new year celebrations

गोव्यात 40 ते 45 लाख पर्यटक दाखल, बागा, कलंगुट, मिरामार बीच हाऊसफुल्ल
Follow us on

पणजी: भारतामधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र असलेल्या गोव्यात (Goa) यंदा कोरोनाचे सावट असूनही पर्यटकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. सध्याच्या माहितीनुसार, गोव्यात थर्टी फर्स्टच्या (New year celebration) सेलिब्रेशनसाठी 40 ते 45 लाख पर्यटक दाखल झाले आहेत. गोव्यातील बागा, कलंगुट, मिरामार हे सर्व समुद्रकिनारे हाऊसफुल्ल झाले आहेत. (New year celebration in Goa)

कोरोनाच्या तडाख्यातून सावरल्यानंतर येथील हॉटेल व्यावसायिकही लाखो पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोव्यातल्या प्रमुख बीचवर असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टीजची तयारी आता पूर्ण झाली आहे.

आकर्षक टेन्ट, विद्युत रोषणाई सोबतीला संगीत अशी जय्यत तयारी हॉटेल व्यवसायिकांनी पर्यटकांच्या दिमतीला ठेवली आहे. तसेच गोव्याची खासियत असलेल्या वेगवेगळ्या स्पेशल सी फूडचे मेनू खास खवय्यांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत.

पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाल्याने हॉटेल व्यावसायिक भलतेच खुशीत आहेत. तर कोरोनामुळे दीर्घ काळानंतर सहकुटुंब बाहेर पडलेले पर्यटकही हॉटेल व्यावसायिकांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा पुरेपूर आस्वाद घेत आहेत.

कोकणात जवळपास तीन लाख पर्यटक दाखल

कोकणात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांनी सध्या समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. निसर्गरम्य हिरवाई पर्य़टकांना खुणावते आहे. कोकणातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली अशा ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे कोकणातील अनेक समुद्रकिनारी पर्यटकांनी फुलून गेले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या कोकणात पर्यटक दाखल झाले आहेत. कोकणात जवळपास तीन लाख पर्यटक दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या:

न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

फक्त मुंबई-पुणे नाही, दिल्ली-गुजरातमधून न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात

थर्टी फर्स्टला लोणावळ्यात जायचा प्लॅन करताय? मग हे वाचाच

(New year celebration in Goa)