AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थर्टी फर्स्टला लोणावळ्यात जायचा प्लॅन करताय? मग हे वाचाच

पुणे आणि मुंबईकरांना आऊटिंगसाठी अत्यंत जवळचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. | Night curfew

थर्टी फर्स्टला लोणावळ्यात जायचा प्लॅन करताय? मग हे वाचाच
पर्यटकांवर कारवाई
| Updated on: Dec 24, 2020 | 11:24 PM
Share

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे (New year 2021) स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने नुकताच महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रशासनाने आपला मोर्चा थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी गर्दी होऊ शकणाऱ्या मुंबईलगतच्या ठिकाणांकडे वळवला आहे. (Night curfew may impose in Lonavala)

त्यामुळेच आता पुणे आणि मुंबईकरांना आऊटिंगसाठी अत्यंत जवळचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी आवाक्याबाहेर जाऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी राज्य सरकारकडे लोणावळ्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

यंदा लोणावळ्यात हॉटेल चालक-मालकांनी देखील नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचं आयोजन केलेलं नाही. लॉकडाऊनमध्ये मोठा फटका बसल्याने कोणत्या ऑफर ही देणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तरीही मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात नेहमीप्रमाणे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता पोलिसांनी आता खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

महापालिका क्षेत्राप्रमाणेच थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात ही नाईट कर्फ्यु लागू झाला, तर तुम्ही इथं आल्यानंतर तुमचं हिरमोड होण्याची शक्यता आहे. हाच हिरमोड तुम्हाला होऊन द्यायचा नसेल तर नाताळ आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी तुमच्यासमोर घर हाच उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

राज्यात 22 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण यूरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

Vishwas Nangare Patil | मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले?

Corona Virus Strain: रत्नागिरी 10, नगर 13, कल्याण-डोंबिवली 55, इंग्लंडमधून आलेल्यांमुळे प्रशासनाला धाकधूक

(Night curfew may impose in Lonavala)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.