AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budaun | उत्तर प्रदेशात 50 वर्षीय महिलेची गँगरेपनंतर हत्या, 2 संशयित आरोपी अटकेत

पश्चिम उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एका 50 वर्षीय महिलेवर गँगरेप करुन तिची हत्या करण्यात आली. (Budaun Gangrape and Murder)

Budaun | उत्तर प्रदेशात 50 वर्षीय महिलेची गँगरेपनंतर हत्या, 2 संशयित आरोपी अटकेत
| Updated on: Jan 06, 2021 | 2:24 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यामध्ये एक खळबजनक घटना घडली आहे. एका 50 वर्षीय महिलेवर गँगरेप करुन तिची हत्या करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका पुजाऱ्यासह 3 जणांवर या घटनेला जबाबदार असल्याचे आरोप झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. ( 50 year old woman gangraped and murdered allegedly by three men including priest in Budaun of UP)

पोलिसांकडून दोघांना अटक

मृत महिलेच्या मुलांनं स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार “आरोपींनी त्याच्या आईला घरासमोर आणून टाकले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.पुजारी आणि इतर लोकांनी आईला आणून दाराबाहेर सोडले आणि गडबडीत ते निघून गेले”, असं पीडित महिलेच्या मुलांनं सांगितले आहे.”माझी आई दररोज पूजा करण्यासाठी जात होती. नेहमीप्रमाणं रविवारी सांयकाळी पूजा करण्यासाठी पाच वाजता आई गेली. मात्र, त्या लोकांनी रात्री 11.30 वाजता येऊन आईला घराबाहेर फेकून दिले”, असं पीडित महिलेच्या मुलानं स्थानिक माध्यमांना सांगितले.

बदायूं पोलिसांनी गँगरेप आणि हत्या प्रकरणी गुन्हा नोंद केल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बदायूंचे पोलीस अधीक्षक संकल्प शर्मांनी दोन जणांना अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय हे प्रकरण योग्य पद्धतीनं न हाताळल्यालनं स्थानिक पोलिसांविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.

पोलीस अधीक्षक संकल्प शर्मांनी या प्रकरणी प्राथमिक तपासात आढळून आलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलीस स्टेशनच्या प्रभारी इन्स्पेक्टरला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या:

कळंबा कारागृह की गुन्हेगारीचा अड्डा? पुन्हा सापडले दोन मोबाईल आणि सिम कार्ड!

3 वर्षीय चिमुरडीचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबईच्या मालाडमध्ये प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार; तरुणीचा जागीच मृत्यू

( 50 year old woman gangraped and murdered allegedly by three men including priest in Budaun of UP)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.