5G Service: आता महाराष्ट्रातही 5G सुरु; मुंबई, पुण्यात या दिवसांपासून मिळणार सेवा; पहिल्या टप्प्यात 13 शहरांचा असणार समावेश

पहिल्या टप्प्यात देशातील 13 महानगरांचा समावेश केला जाणार असून त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांचा समावेश आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश असणार आहे.

5G Service: आता महाराष्ट्रातही 5G सुरु; मुंबई, पुण्यात या दिवसांपासून मिळणार सेवा; पहिल्या टप्प्यात 13 शहरांचा असणार समावेश
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 9:17 AM

मुंबईः देशातील फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच संपली आहे. त्यानंतर 5G सेवा (5G Service) नागरिकांच्या वापरासाठी कधी उपलब्ध होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता फाईव्ह जी सेवा लवकच नागरिकांना उपलब्द होणार आहे. देशभर 12 ऑक्टोंबरपासून (12 October) फाईव्ह जी सेवा सुरु होत आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशभरात 5G सेवेचा लक्षणीय विस्तार होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच, आता या कंपन्यांकडे स्पेक्ट्रमची कमतरता भासणार नसल्यामुळे या सेवेचा दर्जा सुधारणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 13 महानगरांचा समावेश केला जाणार असून त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांचा समावेश आहे.

फाईव्ह-जी सेवा 12 ऑक्टोंबरपासून

देशात 12 ऑक्टोंबरपासून फाईव्ह-जी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय तंत्रज्ज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.

टप्प्याटप्याने होणार विस्तार

एकदा फाईव्ह-जी सेवा देशात सुरू झाली की, नंतर टप्प्याटप्याने या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील 13 महानगरांचा पहिल्या टप्प्यात समावेश

पहिल्या टप्प्यात देशातील 13 महानगरांचा समावेश केला जाणार असून त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांचा समावेश आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश असणार आहे.

तीन कंपन्यांचे 5G नेटवर्क तयार

केंद्र सरकारकडून फाईव्ह जी सेवा सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर ही सेवा देणार कोण असाही सवाल उपस्थित करण्यात येत होता, त्यामुळे ही राज्यात फाईव्ह जी सेवा जाहीर केली गेली असून ही सेवा आता जिओकडूनकडून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिओकडूनच देशात प्रथम 5G सेवा सुरू करण्यात येऊ शकते असंही सांगण्यात आले आहे. Airtel,Vodafone-Idea या तिन्ही कंपन्यांचे 5G नेटवर्क पूर्णपणे तयार असून यासोबतच तिन्ही कंपन्यांनी 5G चाचण्यादेखील पूर्ण केल्या असल्याचे सागंण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.