AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India’s unresolved cases : या 6 हायप्रोफाईल प्रकरणांचा गुंता आजपर्यत CBI देखील सोडवू शकलेली नाही.

कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरण सीबीआयच्या ताब्यात दिले आहे. सीबीआयला प्रकरण सोपवले की तपास झटपट होतोच असे नाही. अनेक हायप्रोफाईल केसेसमध्ये सीबीआयला गुंता सोडविता आलेला नाही.

India's unresolved cases : या 6 हायप्रोफाईल प्रकरणांचा गुंता आजपर्यत CBI देखील सोडवू शकलेली नाही.
India Unsolved Mysteries
| Updated on: Aug 18, 2024 | 8:04 PM
Share

India Unsolved Mysteries : कोलकाता येथील मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आली आहे. या तपास यंत्रणेला स्थानिक पोलिस तपास करण्यास अपयशी ठरले की पाचारण केले जाते. यात अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा समावेश आहे. असे अनेक प्रकरण आहेत. ज्यात सीबीआयला हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे ही प्रकरणे वादात सापडली आहेत. अशा काही हायप्रोफाईल प्रकरणांचा धाडोंळा घेऊयात….

डे मर्डर केस

डे मर्डर केस (2011 ) – मिडचे पत्रकार ज्योतिर्मय डे यांची पवई परिसरात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर अनेक जणांना अटक देखील झाली. तरीही संशय कायम आहे की खरेच गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे का ?

अनुराधा बाली मर्डर केस –

अनुराधा बाली (फिज़ा) मर्डर केस (2012)- अनुराधा बाली, ज्यांनी त्यांचे नाव बदलून फ़िज़ा असे ठेवलेले होते. रहस्यमय परिस्थिती अनुराधा या मृताअवस्थेत सापडल्या होत्या. हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्री चंद्र मोहन यांच्यापासून वेगळे होऊन स्वतंत्र राहणार्‍या फिजा यांचा मृतदेह अचानक सापडला होता.सीबीआय तपासात मृत्यूचे कारण समजले नाही.त्यामुळे या प्रकरणाचा संशयाचा भुंगा कायम आहे.

आरुषी तलवार – हेमराज

14 वर्षीय आरुषी तलवार आणि तलवार परिवारचा घरगुती नोकर हेमराज या दोघांची हत्या नोएडा स्थित तलवार निवास करण्यात आली होती. सीबीआयने सुरुवातीला आरुषीचे आई आणि वडील नुपूर आणि राजेश तलवार यांच्याकडे संशयाची सुई वळविली होती. नंतर खालच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरविले. नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णायक पुराव्या अभावी दोघांची सुटका केली. खरे आरोपी अजूनही मोकाट आहे.

झिया खान डेथ केस (2013) –

बॉलीवुड अभिनेत्री झिया खान मुंबईतील आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये फासावर लटकलेली सापडली. सुरूवातीला यास आत्महत्या मानले गेले. त्यानंतर तिच्या आईने कोर्टात धाव घेतली. या संदर्भात अभिनेता सूरज पांचोली याच्या आरोप लावण्यात आला. या संदर्भात स्थानिक पोलिसांवर टिका झाल्यानंतर सीबीआयकडे हे प्रकरण गेले आहे. सीबीआयला ही हत्या असल्याच्या दाव्याबाबत आवश्यक कोणतेही पुरावे सापडलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते.

सुनंदा पुष्कर –

कांग्रेस नेते शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर या देखील रहस्यमय रित्या दिल्लीतील एका हॉटेलात मृतावस्थेत सापडल्या होत्या. या प्रकरणात आरोप -प्रत्यारोप प्रचंड झाले होते. विष देण्यासह अनेक आरोप झाले होते. परंतू कोणतेही पुरावे सापडले नाहीत. हा मृत्यू आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू म्हणूनच गणला केले.

शीना बोरा हत्याकांड (2012) –

इंद्राणी मुखर्जी हीची मुलगी शीना बोरा हिला कथित रुपाने तिच्या आईने संपविल्याचे म्हटले जात नाही. शीना बोरा हीला इंद्राणी मुखर्जी यांनी दुसऱ्या पतीच्या मदतीने संपवल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी यांना अटक देखील झाली होती. आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचे संपूर्ण सत्य अद्याप बाहेर पडलेले नाही. प्रकरण वादग्रस्त झाले आहे.

सुशांत सिंह राजपूत –

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून, 2020 रोजी मुंबई अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले होते. मुंबई पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासानुसार आत्महत्येचा संशय येत आहे. हे प्रकरण देखी सीबीआयला सोपविण्यात आले होते. या प्रकरणाची सीबीआयची मागणी झाली होती. या प्रकरणात सीबीआयने कोणताही खुलासा केलेला नाही.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?