आसाममध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत 6 बंडखोर ठार; प्रचंड शस्त्रसाठा जप्त

सुरक्षा दल आणि आसाममधील डिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए)च्या बंडखोरा दरम्यान आज सकाळी प्रचंड धुमश्चक्री उडाली. (6 Militants In Assam Pile, One Injured)

आसाममध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत 6 बंडखोर ठार; प्रचंड शस्त्रसाठा जप्त
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 1:27 PM

गुवाहाटी: सुरक्षा दल आणि आसाममधील डिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए)च्या बंडखोरा दरम्यान आज सकाळी प्रचंड धुमश्चक्री उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाने डीएनएलएच्या सहा बंडखोरांचा खात्मा केला. या चकमकीत एक बंडखोर जखमी झाला आहे. या बंडखोरांकडून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. (6 Militants In Assam Pile, One Injured)

नागालँडच्या सीमेजवळ आसामच्या पश्चिमेकडील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात आज सकाळी ही चकमक झाली. कार्बी आंगलोंगमध्ये काही डीएनएलएचे बंडखोर लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दल आणि पोलिसांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं. हे सर्च ऑपरेशन सुरू असतानाच बंडखोरांनी सुरक्षा दल आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरा दाखल गोळीबार केला. काही तास दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू होता. त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोकही घराबाहेर पडले नाहीत. या चकमकीत सहा बंडखोरांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.

सर्च ऑपरेशन सुरूच

ठार करण्यात आलेल्या सहाही बंडखोरांकडील मोठ्या प्रमाणावरील शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चार एके-47 रायफल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या चकमकीनंतर मिचिबैलूंग येथे सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.

महिन्यानंतर ओएनजीसीच्या कर्मचाऱ्याला सोडलं

दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आवाहनानंतर उल्फा (आय)ने अपहरण केलेल्या ओएनजीसीच्या एका कर्मचाऱ्याला सोडलं आहे. तब्बल महिन्याभरानंतर या कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली आहे. रितूल सैकिया असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. 21 एप्रिल रोजी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. 20 मे रोजी मुख्यमंत्र्याने या कर्मचाऱ्याला सोडण्याचं आवाहन केलं होतं. त्याला उल्फा (आय)त्या परेश बरुआने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. (6 Militants In Assam Pile, One Injured)

संबंधित बातम्या:

गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, सकाळपासून नोटा मोजता मोजता उलटली संध्याकाळ; अधिकारीही चक्रावले

राजस्थानात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, दौसामध्ये 341 चिमुकले कोरोनाच्या विळख्यात

चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज?, जाणून घ्या याचा काय असतो उपयोग

(6 Militants In Assam Pile, One Injured)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.