AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्याचा काय भरोसा..? क्रिकेट मॅचसाठी अंपायर म्हणून गेले अन् गमावला जीव.. 65 वर्षांच्या वृद्धासोबत काय घडलं ?

उन्नावमधील शुक्लागंज येथील सप्रू मैदानावर क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात कानपूर क्रिकेट असोसिएशनचे अंपायर माणिक गुप्ता यांचा मृत्यू झाला. कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आयुष्याचा काय भरोसा..? क्रिकेट मॅचसाठी अंपायर म्हणून गेले अन् गमावला जीव.. 65 वर्षांच्या वृद्धासोबत काय घडलं ?
अंपायरचा मृत्यू
| Updated on: Feb 19, 2026 | 12:43 PM
Share

माणसांचं आयुष्य खूप क्षणभंगुर आहे, जीवनाचा काहीच भरोसा नाही. आज हसता खेळता माणूस उद्या दिसलेच याची काही शाश्वती नाही. आणि कोणाला मृत्यू कुठे, कसा, कधी येईल हे तर सांगताच येणार नाही. असंच काहीसं उत्तर प्रदेशमध्ये घडलं. एका 65 वर्षांच्या वृद्धाचा विचित्र परिस्थितीत मृत्यू झाला. माणिक गुप्ता हे अंपायर होते, सकाळी ते एका मॅचसाठी घरातून बाहेर पडले. पण परत आलेच नाहीत. कारण क्रिकेट मॅचदरम्यानच त्यांच्यावर आणि इतर खेळाडूंवर मधमाश्यांनी हल्ला केला, त्यांना माश्यांनी डंख मारला आणि यामुळेच गुप्ता यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी उन्नाव जिल्ह्यातील शुक्लागंज येथील सप्रू मैदानावर क्रिकेट लीग सामना सुरू होता. सामन्यादरम्यान अचानक मधमाश्यांच्या झुंडीने खेळाडूंवर हल्ला केला. मधमाश्यांनी खेळाडूंसह अंपायर माणिक गुप्ता आणि जगदीश शर्मा यांना लक्ष्य केले. सुमारे १० मिनिटे मधमाश्या त्यांना डंख मारत होत्या, ज्यामध्ये पंच माणिक गुप्ता गंभीर जखमी झाले.

30 वर्षांपासून KCA शी निगडीत

गंभीर अवस्थेत, त्यांना ताबडतोब शुक्लागंजमधील खाजगी रुग्णालयात आणि नंतर कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात नेण्यात आले. तिथून डॉक्टरांनी त्यांना कार्डिओलॉजीला रेफर केले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी चार मुली आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत माणिक गुप्ता यांचे अंत्यसंस्कार होतील. माणिक गुप्ता हे फील्डखाना येथील रहिवासी होते आणि गेल्या 30 वर्षांपासून कानपूर क्रिकेट असोसिएशन (KCA) शी संबंधित होते.

अचानक मधमाश्यांचा हल्ला

शुक्लागंज येथील kCA चे अंपायर सुनील यांनी सांगितले की, सप्रू स्टेडियमवर सामन्याचा दुसरा डाव सुरू होता. मात्र अचानक, मधमाश्यांच्या झुंडीने खेळाडू आणि पंचांवर हल्ला केला. जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्ही सर्वजण पाणी पीत होतो, तेवढ्यात अचानक मधमाश्या आल्या. आम्ही सगळ्यांना लगेच जमिनीवर झोपायला सांगितलं, पण त्यानंतरही मधमाशांचा हल्ला सुरूच होता, असं सुनिल म्हणाले. या हल्ल्या, मधमाश्यांच्या डंखाने माणिक गुप्ता गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...