देशातील 70 टक्के प्लंबर 'या' जिल्ह्यातून येतात, वर्षाला 30 लाख कमाई

प्लंबरची स्कील येथील लोकांमध्ये 1930 पासून शिकवण्यास सुरु केली होती. तेव्हा कोलकातामध्ये दोन ब्रिटिश कंपन्या होत्या त्यांना प्लंबरची गरज होती. केंद्रपाडाचे काही तरुणांना तिथे नोकरी मिळाली.

देशातील 70 टक्के प्लंबर 'या' जिल्ह्यातून येतात, वर्षाला 30 लाख कमाई

भुवनेश्वर (ओदीशा) : देशातील 70 टक्के प्लंबर भारतातील एकाच जिल्ह्यातील आहेत. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना, पण हे खरं आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार हा जिल्हा ओदीशामध्ये आहे.

ओदीशातील केंद्रपाडा जिल्हा भितरकनिका राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. येथे जगभरातून लोक ऑलिव्ह रिडले कासव पाहायला येतात. पण येथील प्लंबरही या जिल्ह्यासाठी एक विशेष ओळख आहे. देशातील 70 टक्के प्लंबर येथून येतात. तसेच हा व्यवसाय त्यांना वर्षाला 30 लाख रुपयांची कमाई देतो. येथील प्रत्येक घरात एक प्लंबर आहे.

“येथील लोकांनी 1930 पासून प्लंबरची स्कील शिकण्यास सुरुवात केली होती. तेव्हा कोलकातामध्ये दोन ब्रिटिश कंपन्या होत्या त्यांना प्लंबरची गरज होती. केंद्रपाडाच्या काही तरुणांना तिथे नोकरी मिळाली. यानंतर देशाच्या फाळणीनंतर कोलकाताचे अधिक प्लंबर पाकिस्तानात गेले. त्यामुळे केंद्रपाडाच्या प्लंबरला याचा मोठा फायदा झाला”, असं पट्टामंडाई जिल्ह्यातील स्टेट इन्स्टीट्यूट ऑफ प्लंबिंग टेक्नोलॉजीचे मुख्याधापक निहार रंजन पटनायक यांनी सांगितले.

मोठ्या संख्येने येथे सर्वजण प्लंबिंगचे काम शिकू लागले. कोलकातावरुन हे लोक देशातील इतर ठिकाणी पोहचले. पीढ्यान पीढ्या हे लोक हेच काम करत आहेत. 1970 मध्ये हे लोक खाडी देशापर्यंत पोहचू लागले. आज गल्पमध्ये यांच्यतील काहींची कमाई 50 हजार ते 2.5 लाख रुपये महिना आहे. विशेष म्हणजे 50 हजाराची लोकसंख्या असलेल्या पट्टामंडाईमध्ये 14 बँकांच्या शाखा आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *