AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एसीचा मोठा स्फोट, धक्कादायक घटना, तब्बल 9 जणांचा मृत्यू तर..

दिल्लीमध्ये धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच हाहाकार उडाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीत थेट एसीचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. या घटनेत अनेक जणांचा जीव गेला.

मोठी बातमी! एसीचा मोठा स्फोट, धक्कादायक घटना, तब्बल 9 जणांचा मृत्यू तर..
Delhi fire incident
| Updated on: May 03, 2026 | 9:55 AM
Share

दिल्लीतून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. एसीचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली. हेच नाही तर या आगीत तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीतील शाहदरा येथील विवेक विहार भागातील एका निवासी इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. काही जण या आगीत गंभीर जखमी असल्याचीही माहिती मिळत आहे. पहाटेच्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाची 14 वाहने घटनास्थळी दाखल झाली. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, बी-13 इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आणि ती हळूहळू संपूर्ण इमारतीत पसरली.

दिल्लीत धक्कादायक घटना थेट मोठी आग 

सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी 6:25 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले. एसीचा स्फोट झाल्याने ही आग पसरल्याची माहिती मिळत आहे. काही वेळातच आग पसरली. हा स्फोट इतका जास्त भीषण होता की, मोठा आवाज झाला आणि सर्वत्र आग काही क्षणात पसरली. ज्याने खळबळ उडाली.

एसीचा स्फोट झाल्याने भडकली आग 

मिळालेली अधिक माहिती अशी की, आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चार ते सहा जण गंभीररित्या भाजले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आगीत मोठे नुकसान झाल्याचीही माहिती मिळत आहे.

तब्बल इतक्या लोकांचा घटनेत मृत्यू

अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी संयुक्त बचावकार्य करून अंदाजे 14 ते 20 लोकांना सुखरूप बाहेर काढले. स्थानिकांच्या मते, मागच्या अपार्टमेंटमध्ये काही लोक अडकल्याचा संशय होता. पण पोलिसांनी सध्या आत कोणीही अडकल्याचे वृत्त फेटाळले आहे. मात्र, या आगीच्या घटनेने मोठा हाहाकार उडाला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये अशाचप्रकारची आगीची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मोठ्या आगीची घटना घडली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी