जयपुरात पार पडला अनोखा विवाहसोहळा, ३० वर्षीय पूजानं केलं या मूर्तीसोबत लग्न, चर्चा तर होणारच
विष्णूजींच्या मूर्तीसमोर ध्यान करते. पूजा रात्री जमिनीवरच झोपते.

जयपूर : ही गोष्ट आहे जयपुरातली (Jaipur). पूजा सिंह यांनी ८ डिसेंबरला भगवान विष्णू यांच्या मूर्तीसोबत (idol of Vishnuji) हिंदू रितीरिवाजानं लग्न केलं. लग्नात मेहंदी लावली. पूजा यांच्या घरी गीत गाण्यात आले. ३११ वऱ्हाड्यांनी विष्णू यांच्या मूर्तीचं धुमधडाक्यात स्वागत केले. जयपूरमध्ये या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. पूजाचं शिक्षण राज्यशास्त्रात एम.ए. झालेलं आहे. लग्नानिमित्त ताकभात, मेहंदी, महिला संगीत, फेऱ्याची परंपरा तसेच मंत्र्योच्चारही पार पडले. पूजा गोविंदगडजवळील नरसिंहपुरा येथील रहिवासी आहे. ८ डिसेंबरला पूजानं हिंदू रितीरिवाजानं लग्न केलंय.
मैत्रिणींनी पूजाला वधूसारख सजविलं. ३११ वऱ्याड्यांनी विष्णूजींच्या मूर्तीचं स्वागत केलं. मूर्तीलाही सजविण्यात आलं होतं. लग्नाच्या परंपरेनुसार, वधूची मांग सिंदुरानं भरली जाते. या विवाहात पूजानं स्वतःची मांग चंदनानं भरली.
कुटुंबीयांकडून कन्यादानासाठी ११ हजार रुपये दिले गेले होते. ३० वर्षीय पूजा सिंह यांनी सांगितलं की, लग्नानंतर त्या विष्णूजींनाचं आपला पती मानणार आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत विष्णूजींच्या भक्तीत लीन राहणार असल्याचंही पूजा सिंह म्हणाल्या.
लग्नाच्या या निर्णयानं पूजाचे वडील नाराज झाले. पण, आईच्या मदतीनं तीन हा विवाह पार पाडला. आई रतन कंवर यांनी कन्यादानं केलं. या लग्नात सुमारे दोन लाख रुपये खर्च झाले.
लग्नानंतर भगवान विष्णू यांची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली. पूजा घरी राहते. विष्णूजींच्या मूर्तीसमोर ध्यान करते. पूजा रात्री जमिनीवरच झोपते. या विवाहाची चर्चा राजस्थानात सुरू आहे. पूजा सिंह यांच्या या निर्णयामुळं लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता ती किती दिवस विष्णूभक्तीत लीन होते, ते येणारा काळचं सांगेल.
