AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhar Card अपडेट; नियमात मोठा बदल, पॅनकार्ड, राशन कार्डधाराकांना काय करावे लागणार?

Aadhar Card New Rules : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात मतदार याद्या अद्ययावत करताना आधार कार्डशी संबंधित जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यातच बोगस आधार कार्ड तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविरोधात UIDAI ने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

Aadhar Card अपडेट; नियमात मोठा बदल, पॅनकार्ड, राशन कार्डधाराकांना काय करावे लागणार?
आधार कार्ड अपडेटImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 11, 2025 | 8:45 AM
Share

Aadhaar Card Update : गेल्या काही वर्षांत आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा एक मोठा दस्तावेज झाला आहे. पण याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्ड हे काही भारतीयत्वाचे अथवा नागरिकत्वाचे प्रमाण नाही. आधार कार्ड आधारे इतर अनेक दस्तावेज तयार करण्यात येतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावलं टाकण्याच्या तयारीत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आधार कार्ड तयार करण्याच्या नियमात बदल करत आहे. त्यामुळे बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर परदेशी नागरिकांची ओळख पटवली जाईल. तर मूळ भारतीयांचा डेटा सरकारकडे जमा होईल.

आधार तयार करण्याचे नियम अधिक कडक

नवीन आधार कार्ड तयार करण्याचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, सरकारने त्यादिशेने मोठे पाऊल टाकले आहे. नागरिकांचा पासपोर्ट, रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरचे शालांत प्रमाणपत्र, पॅनकार्ड या सर्वांचे डेटा आधार कार्डशी पडताळणी पाहण्यात येणार आहे. त्यासाठी ही सर्व माहिती ऑनलाईन जतन करून ठेवण्यात येणार आहे. त्यांचे इंटरलिंक झाल्यानंतर, पडताळा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला आधार कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रे तयार करून आधार कार्ड तयार करण्याच्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.

कागदपत्रांची बारकाईने छाननी

UIDAI ने एक नवीन टूलचा वापर सुरू केला आहे. त्यानुसार आधार कार्डच्या नवीन नोंदणीसाठीच्या कागदपत्रांची बारकाईने छाननी करण्यात येईल. यामध्ये वाहन परवाना, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, विद्युत बिलासारख्या दस्तावेजांची उलट तपासणी करण्यात येईल. KYC प्रक्रिया कडक करण्यात येईल.

घुसखोरांची चंगळ

गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर घुसखोरांच्या वसाहती भारतात तयार झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि इतर अनेक मोठ्या शहरात या लोकांना देशविघातक शक्ती भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी सर्व मदत करत आहेत. त्यांचे बोगस जन्म प्रमाणपत्रापासून शाळांच्या दाखल्यापर्यंत बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली आहे. त्याआधारे त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. त्याआधारे हे घुसखोर भारतात सोयी-सुविधा मिळवतात आणि येथेच देशविघातक कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आता व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.