चुकून त्याला मॅसेज गेला…आता तिची नरक यातनातून सुटका कोण करणार?
Horrible Story : चुकून त्याला तिचा मॅसेज गेला नि तिचे आयुष्य नरकासारखे झाले. ती अनोळखी व्यक्ती आज जणू तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. ती वैतागली आहे. तिला त्याच्यापासून दूर व्हायचे आहे. तिने कोर्टात धाव घेतली आहे. काय आहे हे प्रकरण?

एक मॅसेज, केवळ एक अक्षरचा तो मॅसेज. रात्री ती झोपेत असताना मोबाईल तिच्या उशाशी होती नि तो मॅसेज त्याला पोहचला. हा मॅसेज सोशल मीडियावरून एका अनोळखी व्यक्तीला पोहचला नि तिचे आयुष्य नरका समान झाले. आता ती घराबाहेर पडायला सुद्धा घाबरते. कारण तिने अनेक ठिकाणे बदलवून सुद्धा तो तिचा पिच्छा काही सोडत नाही. तो तिच्या पाळतीवर असतो. तो तिचा पाठलाग करतो. खोट्या सोशल अकाऊंटवरून तो तिच्यावर लक्ष ठेवतो. तिच्या घराबाहेर पाळत ठेवतो. तो अनेकदा तुरूंगात गेला, पण त्याने तिचा पाठलाग काही सोडला नाही.
ही गोष्ट युनायटेड किंगडम, इंग्लंडमधील वेल्समधील पोर्ट टॅबलोट शहरातील आहे. येथील बेथन सिम्स हीचे आयुष्य नरकासारखे झाले आहे. 2019 मध्ये एका रात्री जेव्हा ती दिवसभराच्या कामाने थकून घरी आली तेव्हा ती फोन उशाशी ठेवत गाढ झोपली. त्यावेळी तिच्या मोबाईलमधील डेटिंग ॲप -प्लेंटी ऑफ फिश उघडल्या गेले. डोके टच झाल्याने त्या ॲपमधील नील हॅनकॉक या माणसाला एक अक्षराचा मॅसेज गेला. हा मॅसेज चुकून गेला. पण नील तर हात धुवून तिच्या मागे लागला होता.
सकाळी ती झोपेतून उठली, तेव्हा तिचा चॅट बॉक्स मॅसेजने ओसंडून वाहत होता. 39 वर्षांचा नील हॅनकॉक याने तिला मॅसेजवर मॅसेज पाठवले. बेथन हिने कोणताच रिप्लाय, प्रतिक्रिया न दिल्याने तो तिला शिवीगाळ करू लागला. बेथन हिने त्याला ब्लॉक केले. मग नील याने दुसरे प्रोफाईल तयार केले आणि त्याने तिला शोधलेच. ती प्रत्येक वेळी त्याला ब्लॉक करत होती नि तो वेगवेगळ्या सोशल अकाऊंटचा वापर करत तिला शोधत होता. त्यानंतर त्याने बेथनच्या नातेवाईकांचा शोध घेतला. तिच्या आईला त्याने मॅसेज केले. तिची आई थरीन सिम्स तर हादरून गेली. मग दोघींनी पोलिसांकडे धाव घेतली. नील याला अटक करण्यात आली. तो तुरुंगात गेला.
बेथन ही आई असून तिला दोन मुलं असल्याची माहिती आपल्याला असल्याचे नीलने तिला सांगितले. त्याने बेथनचा पत्ता त्याच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केला. या सर्व प्रकारामुळे बेथन पुरती घाबरली. तो तुरुंगातून आल्यावर तिचा पाठलाग करू लागला. त्यामुळे बेथनने मुलांच्या शाळेत सुद्धा ही माहिती दिली. बेथन हिने त्याची माहिती काढली असता नीलने यापूर्वी सुद्धा अनेक महिलांना असाच त्रास दिल्याचे तिच्या लक्षात आले.
नीलवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तिने कोर्टाकडे केली आहे. गेल्या 6 वर्षांपासून ती नीलमुळे भेदरलेली आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे कुटुंब दहशतीखाली आहे. तो कधी कुठून तिच्यावर पाळत ठेवत असेल याच विचारत ती आणि कुटुंब दिवस काढतात. रात्री व्हरांड्यात आवाज झाला तरी त्यांना भीती वाटते. त्यामुळे या माणसापासून कुटुंबाची कायमची सुटका करण्याची विनंती तिने केली आहे.
