श्रद्धा मर्डर केसमध्ये नवीन खुलासा, पोस्टमॉर्टन रिपोर्टमधून काय मिळाली महत्वाची माहिती

डीएनए अहवालासाठी श्रद्धाच्या वडिलांचे सॅम्पल वापरण्यात आले होते. ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एम्समध्ये त्याचे विश्लेषण केले गेले. या विश्लेषणात करवतीने हाडे कापल्याचे स्पष्ट झाले.

श्रद्धा मर्डर केसमध्ये नवीन खुलासा, पोस्टमॉर्टन रिपोर्टमधून काय मिळाली महत्वाची माहिती
श्रद्धा हत्त्याकांड Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 11:49 AM

नवी दिल्ली : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या तरुणीच्या दिल्लीत (Delhi Murder Case) झालेल्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. श्रद्धाच्या हाडांचे विश्लेषण करण्यात आले. त्याचा अहवाल आला आहे. त्यात करवतीने तिची हाडे कापल्याचे स्पष्ट होत आहे. १८ मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने हत्या केली. आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले होते. आता दिल्ली पोलीस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहे.

काय आहे अहवाल

श्रद्धा वालकरच्या २३ हाडांचे पोस्टमॉर्टन विश्लेषण करण्यात आले. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. डीएनए टेस्टमध्ये ही हाडे श्रद्धाची असल्याचा अहवाल आला होता. डीएनए अहवालासाठी श्रद्धाच्या वडिलांचे सॅम्पल वापरण्यात आले होते. ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एम्समध्ये त्याचे विश्लेषण केले गेले. या विश्लेषणात करवतीने हाडे कापल्याचे स्पष्ट झाले. करवतीचे निशानही त्यावर सापडले आहे. श्रद्धा हत्याकांड उघडकीस आल्यानंतर आफताब पुनावाला याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आफताबची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. मात्र आफताब वारंवार आपला जबाब बदलत होता.

हे सुद्धा वाचा

काय होते वादाचे कारण? श्रद्धाला आफताबसोबत दिल्लीला शिफ्ट व्हायचे होते. मात्र आफताब यासाठी तयार नव्हता. तसेच आफताब सतत कुणाशी तरी चॅटिंग करत असायचा. श्रद्धाने याबाबत विचारताच सारवासारव करायचा. यातूनच दोघांमध्ये भांडणं व्हायची, असे दिल्ली पोलीस सूत्रांनी सांगितले.दोघांमधील भांडण आणि दुरावा मिटावा यासाठी आफताबा श्रद्धाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड टूरवर घेऊन गेला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.