Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात 5 महिन्यांमध्ये निकाल, आरोपी संजय रॉय दोषी, सोमवारी सुनावणार शिक्षा

कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला दोषी ठरवण्यात आलं आहे.

मोठी बातमी! कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात 5 महिन्यांमध्ये निकाल, आरोपी संजय रॉय दोषी, सोमवारी सुनावणार शिक्षा
Follow us
| Updated on: Jan 18, 2025 | 3:03 PM

कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता सियादह कोर्टानं आपला निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात न्यायालयानं आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवलं आहे, आता सोमवारी या प्रकरणात न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे. आठ ऑगस्ट 2024 च्या मध्यरा‍त्रीची ही घटना आहे.कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. आज या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळाला आहे, संजय रॉय याच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध झाले आहेत. कोर्टानं त्याला दोषी ठरवलं आहे.

या महिला डॉक्टरची 8 ऑगस्टच्या मध्यरात्री बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण तापलं होतं. पश्चिम बंगालमध्ये प्रचंड आंदोलन झालं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून या प्रकरणाचा तपास 13 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला, सीबीआयनं या प्रकरणात आरोपीविरोधात मजबूत पुरावे गोळा केले. तसेच 120 साक्षीदाराच्या साक्षी नोंदवल्या. या प्रकरणात 66 दिवस ऑन कॅमेरा ट्रायल सुरू होती. अखेर कोर्टानं या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवलं आहे, त्याला आता सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

या प्रकरणात सीबीआयनं संजय रॉय याला अटक केलं होतं. पीडितेच्या शरीरावर जे लाळीचे नमुने आढळून आले त्याचा डीएनए आरोपीच्या डीएनएशी मॅच होत आहे, असा दावा सीबीआयनं कोर्टात केला.आरोपीने आधी बलात्कार केला आणि नंतर या महिला डॉक्टरची हत्या केली अशी माहिती सीबीआयनं न्यायालयात दिली.पिडीता स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तीने आरोपीवर वार करण्याचा देखील प्रयत्न केला. तिच्या नखाचे ओरखाडे आरोपीच्या शरीरावर देखील होते अशी माहिती सीबीआयनं न्यायालयाला दिली.

दरम्यान या प्रकरणाचा निकाल आता समोर आला आहे, न्यायालयानं या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवलं असून, त्याला आता सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.