Viral Video: स्टेजवर डान्स करीत असताना कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, जम्मू गणेशोत्सव कार्यक्रमावर शोककळा, एकाच आठवड्यातील तिसरी घटना

गेल्या काही दिवसांत स्टेजवर कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची ही तसिरी घटना आहे. तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकार प्रसिद्ध गायक केके यांचा एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्सनंतर मृत्यू झाला होता. तरुण मुलांचे असे मृत्यू होत असल्याने चिंता वाढली आहे. सगळ्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

Viral Video: स्टेजवर डान्स करीत असताना कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, जम्मू गणेशोत्सव कार्यक्रमावर शोककळा, एकाच आठवड्यातील तिसरी घटना
स्टेजवर हार्ट अटॅकमुळे मृत्यू Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 4:20 PM

जम्मू- स्टेजवर डान्स परफॉर्म (dance performance)करताना हार्ट अटॅक (heart attack)आल्याने मृत्यू झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. 20 वर्षीय कलाकार योगेश गुप्ता मुलीचे कपडे घालून स्टेजवर डान्स करीत होता. ओम नम: शिवाय या भजनावर त्याचा डान्स सुरु असताना अचानक तो खाली ( fell down on stage)कोसळला. प्रेक्षकांना तो नाचाचाच भाग असल्याचे वाटत होते. पण आचके देत त्याचा स्टेजवर मृत्यू झाला. जम्मूच्या बिनशाह परिसरात कोथे नावाच्या गावात सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमावर यामुळे शोककळा पसरली.

गेल्या काही दिवसांत स्टेजवर कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची ही तसिरी घटना आहे. तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे प्रसिद्ध गायक केके यांचा एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्सनंतर मृत्यू झाला होता. तरुण मुलांचे असे मृत्यू होत असल्याने चिंता वाढली आहे. सगळ्यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. जर तुमच्या घरात हार्ट अटॅकची समस्या घरातील कुणाला असेल, जर तो अनुवंशिक असेल तर ह्रद्यात दुखू लागल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा, असे हे तज्ज्ञ सांगत आहेत.

हे सुद्धा वाचा

डान्स करताना स्टेजवर पडला कलाकार

जम्मूत सुरु असलेल्या कार्यक्रमात हा तरुण भजनावर नाचत होता. यावेळी त्याचे पाय अडखळले. त्याने स्वताला सांभाळायचा प्रयत्न केला, मात्र तो स्जेवरच कोसळला. त्याने पुन्हा उभे राहून डान्स करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तो पुन्हा कोसळला. हा त्याच्या डान्सचाच एक भाग असल्याचे प्रेक्षकांना वाटत होते. त्यानंतर हा तरुण पुन्हा उठण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्यानंतर त्याचे शरीर आचके देऊ लागले आणि तो अखेरीस गतप्राण झाला.

साथीदार त्याचे नृत्य संपण्याची वाट पाहत होते

स्टेजवर बाजूला उभे असलेले त्याचे सहकलाकार त्याचा डान्स संपण्याची वाट पाहत होते. तो बराच वेळ पडून होता, तो उठत नसल्याने स्टेजवर भगवान शंकराच्या वेशात असलेल्या कलाकाराने जवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशईर झाला होता. तातडीने म्युझिक थांबवण्यात आले आणि स्टेजवर त्याला पाहण्यासाठी गर्दी जमा झाली. त्यानंतर या 20 वर्षीय कलाकाराला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले, तिते त्याला मृत घोषित करण्यात आलवे.

एकाच आठवड्यातील तसरी घटना

गेल्या आठवडाभरात स्टेजवर परफॉर्मन्स करताना ह्रद्यविकार आल्याने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. 1. बर्थ डे पार्टी डान्स करताना तरुण कोसळला

1 सप्टेंबर रोजी बरेलीत बर्थडे पार्टीत डान्स करताना एक व्यक्ती अचानक कोसळली. प्रेक्षकांना ही व्यक्ती अभिनय करत आहे असे वाटत होते. काही वेळ झाले तरी तो उठला नाही म्हणून लोकं त्याच्या अवतीभवती जमा झाले. त्यावेळी त्याला हार्ट अटॅक आल्याचे समोर आले. तो बेशुद्ध अवस्थेत होता, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले

2. हनुमान झालेल्या तरुणाचा स्टेजवर मृत्यू

3 सप्टेंबर रोजी मैनपुरीच्या गणेशोत्सवात हनुमानाची भूमिका करणाऱ्या तरुणाचाही स्टेजवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तो राम भजनावर डान्स करीत होता. डान्स करताना तो अचानक खाली कोसळला. तरुण उठत नसल्याचे पाहून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.