आम्ही कृषीमाल खरेदी करतच नाही; शेतकऱ्यांच्या बहिष्कारानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण

आम्ही केवळ भारतीय खाद्य निगमसाठी (FCI) केवळ भांडारांची निर्मिती करतो. | Adani group

आम्ही कृषीमाल खरेदी करतच नाही; शेतकऱ्यांच्या बहिष्कारानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 7:46 AM

नवी दिल्ली: दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अदानी आणि अंबानी समूहावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर या कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आहेत. अदानी समूहाने या सगळ्यावर तातडीने आपली बाजू स्पष्ट केली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा कृषीमाल खरेदी करत नाही किंवा कृषीमालाची किंमत ठरवण्यातही आमची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगत अदानी समूहाने शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. (farmers announced boycott on Ambani and Adani group)

अदानी समूहाने ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आम्ही केवळ भारतीय खाद्य निगमसाठी (FCI) केवळ भांडारांची निर्मिती करतो. शेतकऱ्यांकडून किती प्रमाणात धान्य घ्यावे किंवा त्याची किंमत काय असावी, हे ठरवण्याचे कोणतेही अधिकार आम्हाला नाहीत. आम्ही केवळ FCI ला धान्याच्या साठवणुकीची सुविधा पुरवतो आणि त्याची देखभाल करतो. शेतकऱ्यांकडून किती आणि कोणत्या दराने कृषीमाल खरेदी करायचा, याबाबतचे निर्णय भारतीय खाद्य निगमच घेते, असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले.

FCI नेमके काय करते?

FCI कडून खासगी कंपन्यांना धान्याच्या भांडारांसाठी शुल्क अदा केले जाते. मात्र, या कंपन्यांना या धान्याच्या विपणन आणि वितरणाचा अधिकार नाही. सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी (PDS) धान्य खरेदी आणि ते एका जागेहून दुसऱ्या जागी पोहोचवणे या गोष्टी FCI च्या अखत्यारित येतात.

शेतकऱ्यांचा नेमका आक्षेप काय?

मोदी सरकारने अदानी आणि अंबानी समूहाच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अदानी समूहाकडून धान्याची मोठ्याप्रमाणावर आणि दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी गोदामांची निर्मिती केली जात आहे. जेणेकरून नंतर हे धान्य त्यांना अधिक किंमतीने विकता येईल.

‘जिओ सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही’

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. बड्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. मात्र, आता आम्ही जिओ सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांना दिला आहे.

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलन Live Update | शेतकरी कायदे रद्द करा, विरोधी पक्षांची मागणी

MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम

शेतकरी कृषी कायद्यासोबतच, राजस्थानमधील पंचायत समितीच्या निकालावरुन स्पष्ट : जावडेकर

(farmers announced boycott on Ambani and Adani group)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.