loudspeakers In UP : योगी सरकारचे लाऊडस्पीकरवर कडक पाऊल; मंदिर-मशीदवरील 29 हजार भोंग्याचा आवाज ‘बंद’, 6031 काढले

यूपीमध्ये आतापर्यंत 125 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. तर 17,000 धार्मिक स्थळांवर स्पीकरचा आवाज निर्धारित मानकांनुसार करण्यात आला आहे.

loudspeakers In UP : योगी सरकारचे लाऊडस्पीकरवर कडक पाऊल; मंदिर-मशीदवरील 29 हजार भोंग्याचा आवाज ‘बंद’, 6031 काढले
धार्मिक स्थळावरून लाऊडस्पीकर हटवण्यात येच आहेत
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Apr 27, 2022 | 4:46 PM

लखनऊ : देशाची राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri) मध्ये हनुमान जयंतीनंतर हिंसाचार झाला. त्याच्या झळा अख्या देशाला बसल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी सांगितले होते. तसेच परवानगीशिवाय मिरवणूक काढू नका, माईक वापरा पण आवाज परिसराबाहेर जाऊ नये असा आदेशही त्यांनी काढला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी यांच्या सूचनेनंतर धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर (loudspeaker) उतरविण्यात आले आहेत किंवा त्यांचा आवाज मंदावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत 6031 लाऊडस्पीकर काढण्यात आले असून 29674 चा आवाज निर्धारित मानकांनुसार कमी करण्यात आला आहे. यूपी पोलिसांच्या आदेशानुसार मंदिर, मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. यासोबतच अलाउद्दीन पुरच्या बडी मशीद (mosques) आणि शिवमंदिर समितीच्या संमतीने अतिरिक्त लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. यासोबतच अशा ठिकाणांचा अहवालही सरकारने मागवला आहे जिथे अजूनही मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवले जात आहेत. हा अहवाल 30 एप्रिलपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी यांचे आदेश

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा आवाज निर्धारित मानकांनुसारच वाजवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासोबतच लाऊडस्पीकरचा आवाज केवळ धार्मिक आवारातच राहावा, त्यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ नये, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाचा परिणाम दिसू लागला आहे. मंदिर असो की मशीद, अनेक ठिकाणी लाऊडस्पीकर एकतर काढून टाकण्यात आले आहेत, किंवा त्यांचा आवाजाची मर्यादा कमी करण्यात आली आहे.

संवेदनशील ठिकाणी फोर्स अलर्टवर

दुसरीकडे, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अधिकारी प्रशांत कुमार यांच्या म्हणण्यानुसार, यूपीमध्ये आतापर्यंत 125 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. तर 17,000 धार्मिक स्थळांवर स्पीकरचा आवाज निर्धारित मानकांनुसार करण्यात आला आहे. सर्वधर्मीयांचे सण पाहता 37 हजार 344 धर्मगुरूंशीही लाऊडस्पीकरबाबत बोलणे झाले आहे. एडीजी म्हणाले की, पोलिस प्रशासनही गुडबाय प्रार्थनेबाबत अत्यंत दक्ष आहे. जवळपास 31 हजार ठिकाणी रमजान ईदची नमाज होणार आहे. या सर्व ठिकाणी लाऊडस्पीकरच्या आवाजाचीही काळजी घेतली जाणार आहे. यासोबतच संवेदनशील ठिकाणी पोलिस दलाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

या 11 ठिकाणाहून हटवले ध्वनिक्षेपक

1. आग्रा झोनमधील 30 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत 2. मेरठ झोनमधील 1215 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. 3. बरेली झोनमधील 4 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत 4. लखनौ झोनमधील 912 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत 5. कानपूर झोनमधील 349 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत 6. प्रयागराजमधील धार्मिक स्थळावरून लाऊडस्पीकर हटवण्यात आला आहे 7. गोरखपूर झोनमधील दोन धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत 8. वाराणसी झोनमधील 1366 धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत 9. लखनौ आयुक्तालयातील 190 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत 10. गौतमबुद्ध नगरमधील 19 धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक हटवण्यात आले 11. वाराणसी आयुक्तालयातील 170 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत

इतर बातम्या :

Corona : कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही; कोरोनाच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान म्हणाले, लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता

Navneet Rana: संजय राऊतांना ॲट्रॉसिटी लावा, नवनीत राणा यांची थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रार, पुन्हा जातीचा उल्लेख

ऑनर किलिंग नव्हे हे तर हॉरर किलिंग! घरातल्यांच्या विरोधात जाऊन Love Marriage, मुलीची गोळ्या घालून हत्या

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें