AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय

अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय
abhijeet dipke Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 1:39 PM
Share

काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने जंतर -मंतरवर जवळपास एक महिनाभर आंदोलन सुरू होतं. त्यानंतर संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाला हिंसक वळण लागलं, पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला तर आंदोलकांनी देखील दगडफेक केल्याचा आरोप आहे. दरम्यान त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला, सध्या शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली होती. या आंदोलनानंतर त्यांनी आता शाळा सुधारण्याची मोहीम हाती घेतली आहे.

सीजेपीने हाती घेतलेल्या या मोहिमेनंतर राजस्थान सरकार आता अलर्ट मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. शनिवारी राजस्थान सरकारकडून थेट आदेश काढण्यात आला आहे. सरकारकडून तडकाफडकी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी तब्बल बारा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये ज्या ठिकाणी सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला होता, त्याच शाळेच्या सुधारणेपासून या कामाचा शुभारंभ होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार राजस्थान सरकारने शाळेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तीन वर्षांचा एक प्लान बनवला आहे. या प्लान अंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये 12 हजार 500 कोटी रुपये खर्च करून राजस्थानात शाळांमध्ये सुधारणा घडवून आणल्या जाणार आहेत. राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांपूर्वी सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या हातात आयता मुद्दा सापडू नये, यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला असल्याची देखील चर्चा सुरू आहे.

काय आहे संपूर्ण प्लान? 

मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार 487.7 कोटी रुपये खर्च करून 3587 नव्या शाळेच्या इमारती बांधल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे 83 हजार 783 क्लासरूम देखील तयार केले जाणार आहेत. त्यासाठी आठ हजार 378 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. तसेच ज्या शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत, त्यांच्या रिपेरिंगचं काम देखील युद्धपातळीवर हाती घेतलं जाणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ