आमदार शहाजी बापू पाटलांच्या,’ काय झाडी, काय डोंगारने..आसामचे पर्यटक वाढले

शिवसेनेत ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठी फूट घडवून आणली होती. त्यावेळी शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना आसामच्या गुवाहाटी शहरातील हॉटेल 'रेडिसन्स ब्लू' मध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळच्या शहाजी बापू पाटील यांच्या, 'काय झाडी, काय डोंगार.. डायलॉग प्रसिद्ध झाला होता.

आमदार शहाजी बापू पाटलांच्या,' काय झाडी, काय डोंगारने..आसामचे पर्यटक वाढले
shahaji bapu patilImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 3:49 PM

प्रदीप कापसे, आसाम | 2 नोव्हेंबर 2023 : ” काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके हा शहाजीबापू यांचा डायलॉग शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली तेव्हा प्रचंड फेमस झाला होता. शहाजीबापू पाटील जेव्हा बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते, तेव्हा त्यांच्या मित्रामध्ये झालेला हा संवाद तेव्हा खूपच व्हायरल झाला होता. या व्हायरल डायलॉगने जेवढी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रसिद्धी मिळाली तितकीच प्रसिद्धी आता आसामच्या पर्यटनाला मिळत आहे. आसाम आणि तेथील कामाख्या देवीचे मंदिर पाहायला महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

शिवसेनेत ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठी फूट घडवून आणली होती. त्यावेळी शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना आसामच्या गुवाहाटी शहरातील हॉटेल ‘रेडिसन्स ब्लू’ मध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या एका मित्राचा त्यांना अचानक फोन आला. त्यावेळी हॉटेलात आल्यानंतर ते खिडकी तेथील निसर्ग सौदर्य पाहात असतानाच त्यांच्या मित्राने पलिकडून काय दोन-चार दिवस फोन नाय, काय नाय, कुठंय म्हटल्यावर त्यांनी खिडकी समोरील डोंगराकडे पाहून म्हटलं होतं, काय डोंगार, काय झाडी…काय हाटील…एकदम ओकेमध्ये आहे सगळं रफीक भाई.. अशा शब्दात आसामच्या निसर्ग सौदर्याचे वर्णन केले. हे संभाषण खूपच व्हायरल झाल्याने आसाममध्ये महाराष्ट्रातील पर्यटक येण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले जाते.

कामाख्या देवी दर्शन सुलभ होणार

आसामला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण खूप वाढले आहेत. आसामला कामाख्या देवीचे मंदिर असून या मंदिरात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दर्शन घेऊन कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले होते. आता कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आसामचे पर्यटन विभागाचे सचिव कुमार बोरा यांनी पर्यटक वाढण्यासाठी अनेक योजना आखल्याचे त्यांनी सांगितले. कामाख्या देवीला येणाऱ्या पर्यटकांसाठी स्पेशल कॉरिडॉर उभारण्याची योजना आहे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्याची योजना असून दिव्यांग पर्यटकांच्या सोयीसाठी लिफ्ट वगैरे सुविधा उभारण्याची योजना आहे. महाराष्ट्रातून येणारा पर्यटक नेहमीच जास्त आहे. दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर फूटफॉल आहे. आसाममध्ये चहाचे मळे असल्याने ते पहाण्यासाठी पर्यटक यावेत यासाठी ‘टी टुरिझम’ करण्याची योजना असल्याचेही कुमार बोरा यांनी सांगितले. काझीरंगा येथे गेंडे पाहण्यासाठी लोक येत असतात त्यांना अधिक सुविधा देण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.