AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mathura impact:मथुरा मंदिर परिसरात नॉनव्हेज बंदीनंतर, मुस्लीम हॉटेल मालकांनी बदलली रेस्टॉरंटची नावे, आणि मेनू कार्डमध्येही झाले हे बदल..

हॉटेलची मूळ ओळख पुसून नवी ओळख, नवे नाव, नवे मेन्यू कार्ड, नवे कर्मचारी हे सगळे करण्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागला, असेही या हॉटेल मालकाने सांगितले आहे. याचा व्यवसायाला फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले. मासाहारी हॉटेल चालवताना जे प्रतिदिन उत्पन्न १५ हजारांच्या घरात येत होते, ते आता ४ हजारांवर आल्याचे ते सांगतात.

Mathura impact:मथुरा मंदिर परिसरात नॉनव्हेज बंदीनंतर, मुस्लीम हॉटेल मालकांनी बदलली रेस्टॉरंटची नावे, आणि मेनू कार्डमध्येही झाले हे बदल..
Mathura Mulims change hotel namesImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 2:17 PM
Share

मथुरा – मथुरेच्या मंदिर (Mathura Temple)परिसरात उ. प्रदेश सरकराकडून नॉनव्हेज (Nonveg ban)आणि दारुच्या विक्रीला मनाई करण्यात आल्यानंतर मुस्लीम हॉटेल मालकांनी  (Muslim hotel owners)केवळ आपल्या दुकानांची नावेच हिंदू केली नाहीत, तर दुकानांतील मुस्लीम कर्मचाऱ्यांऐवजी आता तिथे हिंदू कर्मचारी ठेवले आहेत. त्याचबरोबर या हॉटेलांचे मेन्यू कार्डही बदलण्यात आले आहे. काऊंटरवर बसणाऱ्या मुस्लीम व्यक्तींऐवजी आता तिथे हिंदू कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली आहे .आधी हे शांतीपूर्ण मंदिरांचे शहर होते. सौहार्दाने सगळे एकत्रित राहत होते, आता परिसरात कुणी घरी मांसाहारी पदार्थ करण्यासाठीही घाबरतात, अशी खंत शहरातील मुस्लीम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. मंदिर परिसरात व्हेड-नॉनव्हेजच्या या वादातून सामाजिक समीकरणेच बदलू लागलीत की काय अशी शंका घेण्यास वाव आहे. मथुरा शहरातील एका मुस्लीम हॉटेल व्यावसायिकाची कहाणी अनेकांना अंतर्मुख करणारी अशीच मानावी लागेल.

नेमकं काय घडलंय

मथुरातील एका हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे कुटुंब १९७४ पासून ताजमहाल नावाचे एक हॉटेल या परिसरात चालवत होते. आता बदललेल्या परिस्थितीत हे हॉटेल चालवणे अवघड झाले आहे. प्रत्येक वेळी भीतीचे वातावरण होते. त्यामुळे व्यवसाय चालवण्यासाठी ओळख लपवण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. हॉटेल हेच परिवार चालवण्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन असल्याने दुसरा काही पर्यायच राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी त्यांचे वडल हे हॉटेल चालवायचे. आता बदललेली परिस्थिती पाहता सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी हॉटेल ताजमाल हे हॉटेलचे मनाव बदलून रॉयल फॅमिली रेस्टॉरंट असे नाव केले आहे. कोणत्याही अडचणीला तोंड द्यावे लागू नये म्हणून हॉटेलमध्ये कार्यकरत असलेल्या ८ मुस्लीम कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरुन काढून टाकले. हे मुस्लीम कारागीर चांगल्या चवीचे शाकाहारी पदार्थ तयार करत असूनही त्यांना हा निर्णय़ घ्यावा लागला. आता त्यांनी गैर मुस्लिमांना हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून नेमले आहे.

शाकाहारी पदार्थांना प्राधान्य

त्यांचे हॉटेल ताजमहाल हे आधी नॉनव्हेजसाठी त्या परिसरात प्रसिद्ध होते. हॉटेलमधील चिकन कोरमा, चिकन चंगेजी आणि निहारी ग्राहकांना आवडत असे, प्रसिद्धही होती. आता नव्या मेन्यू कार्डमध्ये नॉनव्हेज पदार्थांना विराम देण्यात आला आहे. त्याऐवजी पनीर चंगेजी, पनीर कोरमा यासह कढाई पनीर, शाही पनीर, डाळ तडका यासारख्या शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. मुस्लीम मालकाचे हॉटेल आहे हे कळू नये म्हणून हॉटेलच्या काऊंटरवर बसण्याचेही त्यांनी बंद केल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही ग्राहकाला हे कळू नये यासाठी हे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काऊंटरवरही गैर मुस्लीम व्यक्ती बसवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

या बदलासाठी मोठा काळ लागला

हॉटेलची मूळ ओळख पुसून नवी ओळख, नवे नाव, नवे मेन्यू कार्ड, नवे कर्मचारी हे सगळे करण्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागला, असेही या हॉटेल मालकाने सांगितले आहे. याचा व्यवसायाला फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले. मासाहारी हॉटेल चालवताना जे प्रतिदिन उत्पन्न १५ हजारांच्या घरात येत होते, ते आता ४ हजारांवर आल्याचे ते सांगतात. इतके सगळे होऊनही काही माथेफिरुंना आपले व्यवस्थित सुरु आहे, हे बघवत नसल्याचे हॉटेल मालक सांगतात.

आता तर मांस खाण्याचीही भीती वाटते.

आपल्या सगळ्या जगण्यात मथुरेत एवढी कटूता यापूर्वी पाहिली नाही, असे ते सांगतात. आधी हे शांतीपूर्ण मंदिरांचे शहर होते. सौहार्दाने सगळे एकत्रित राहत होते, आता परिसरात कुणी घरी मांसाहारी पदार्थ करण्यासाठीही घाबरतात, अशी खंत त्यांनी सांगितली. कुणीतरी भडक डोक्य़ाचा माणूस बिफ खाण्याच्या आरोपावरुन गोँधळ निर्माण केरल, अशी भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मांसावर घातलेल्या बंदीविरोधात हायकोर्टात याचिका केली मात्र अद्याप ती प्रलंबित असल्याचेही या हॉटेल मालकांनी सांगितले आहे. त्यामुळे अधिक नुकसान सहन करण्यापेक्षा हॉटेलचे नाव आणि मेन्यू बदलणे हाच एकमेव मार्ग शिल्लक राहिला होता, असे त्यांनी सांगितले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.