Economic downturn : सावधान मंदीची चोर पावले पडत आहेत? Vedantu, Netflix नंतर आता Cars24 या कंपनीने कामावरून काढले 600 लोकं

Economic downturn : सावधान मंदीची चोर पावले पडत आहेत? Vedantu, Netflix नंतर आता Cars24 या कंपनीने कामावरून काढले 600 लोकं
कर्मचाऱ्यांना काढून टाकले
Image Credit source: tv9

Cars24 नावाच्या ई-कॉमर्स कंपनीने 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मात्र, याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, व्यवसाय करण्याची ही सामान्य प्रक्रिया आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 19, 2022 | 9:03 PM

नवी दिल्ली : जगात कोरोना (Corona) काळात अनेकांना उपाशीपोटी झोपावं लागलं, नोकऱ्या गेल्यानं 2 वेळच्या जेवण मिळणंही मुश्कील झालं. त्यात अनेकांनी कसेबशी मात केली. पण आता रशिया-युक्रेन युद्ध, श्रिलंकेत महागाईमुळे झालेले पडसाद त्यानंतर प.बंगालमध्ये सध्याची स्थितीमुळे भारतात ही तशी स्थिती होईल असे म्हटले जात आहे. त्यातच देशातही आर्थिक मंदी आणि बेरोजगारीची (unemployment) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात आर्थिक मंदीची चिन्हे दिसू लागल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, एकामागून एक अनेक कंपन्या लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. त्यामुळे हे आर्थिक मंदीचे लक्षण मानावे का असाच प्रश्न लोकांच्या आणि तज्ज्ञांना पडत आहेत? ताजे उदाहरणावरून असेच वाटत असून देसातील एका ई-कॉमर्स कंपनी (e-commerce company) आपल्या वापरलेल्या कार विकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सुमारे 500 हुनअधिक लोकांचा रोजगार गेला आहे.

Cars24 600 लोकांना काढून टाकले

Cars24 नावाच्या ई-कॉमर्स कंपनीने 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मात्र, याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, व्यवसाय करण्याची ही सामान्य प्रक्रिया आहे. ती दरवर्षी कामगिरीच्या आधारे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकते, हाही तिचा एक भाग आहे. कंपनीचा खर्च कमी करण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. Cars24 च्या कर्मचार्‍यांची संख्या सुमारे 9,000 आहे आणि आता यापैकी 6.6% लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

वेदांतूने महिन्यातून दोनदा लोकांना काढून टाकले

दरम्यान, एज्युकेशन टेक कंपनी वेदांतूनेही शेकडो लोकांना दोनदा नोकरीवरून काढून टाकले आहे. मे महिन्यातच, कंपनीने प्रथम 200 लोकांना कामावरून काढून टाकले आणि नंतर बुधवारी 424 लोकांना (वेदांतू ले ऑफ). कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5900 च्या जवळपास आहे. कंपनीने पहिल्यांदाच टाळेबंदीबाबत सांगितले होते की, 120 कंत्राटदार आणि 80 पूर्णवेळ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून हा निर्णय घेतला आहे.

बुधवारी, मे महिन्यातच वेदांतूने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. या संदर्भात कंपनीचे सीईओ वामसी कृष्णा यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये अनेक प्रकारची चिंता दिसून येते. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी संबंधित हा विषय नाही. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात अनिश्चितता वाढत आहे. मंदीच्या भीतीबरोबरच महागाई आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानेही चिंता वाढली आहे.

त्यांनी त्यांच्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे की, ‘हे सांगण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. पण मला खूप वाईट वाटतं. पुलकित, आनंद (सहसंस्थापक) आणि मी तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वेदांतूला दिल्याबद्दल तुमचे ऋणी राहू. लक्षात ठेवा की ही तुमची चूक नाही किंवा तुम्ही काही केले आहे किंवा केले नाही म्हणून ते घडत नाही. तुम्ही खूप छान आहात आणि इतर कंपन्या तुमच्यासाठी भाग्यवान असतील.

युनाकेडमीनेही 600 लोकांना नोकरीवरून काढले

याआधी एप्रिलमध्ये आणखी एका एज्युटेक कंपनी अनॅकॅडमीने 600 जणांना कामावरून काढून टाकले होते. लिडो लर्निंग या स्टार्टअप कंपनीने रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून गुंतवणूक प्राप्त केली असताना त्यांचे कामकाज बंद केले आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की लिडोने गेल्या अनेक महिन्यांपासून पगार दिलेला नाही. याशिवाय Meesho,Furlenco आणि Trell या कंपन्यांनीही लोकांना कामावरून काढून टाकले आहे.

Netflix ने 150 लोकांना काढून टाकले

कामावरून काढून टाकण्याच्या घटनेचे पडसाद केवळ भारतातच नाही तर जगाच्या इतर भागातही पाहायला मिळत आहेत. लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix ने देखील सुमारे 150 कर्मचारी आणि डझनभर कंत्राटदारांना कामावरून काढून टाकले आहे. नेटफ्लिक्सच्या फॅन-केंद्रित वेबसाइट टुडमसाठी काम करणार्‍या किमान 26 कंत्राटदारांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे द व्हर्जने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. Netflix ने यापूर्वी सुमारे 25 लोकांना मार्केटिंग टीममधून काढून टाकले आहे, ज्यात Tudum शी संबंधित सुमारे डझनभर लोकांचा समावेश आहे.

बुधवारी ज्या 26 जणांना कामावरून कमी करण्यात आला होतं, त्यांना एका ग्रुप ईमेलद्वारे याची माहिती देण्यात आली. मात्र, नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्या एरिका मॅसनहॉल यांचे म्हणणे आहे की, हे ईमेल कंत्राटी कंपनीने पाठवले होते. कंपनीने द वर्जला सांगितले की, कामावरून काढण्यात आलेले बहुतेक लोक यूएस-आधारित आहेत. छाटणीचे हे पाऊल कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी संबंधित नसून, आर्थिक कारणांमुळे असे करणे भाग पडले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें