Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्यांदाच 21 राज्यात भाजपा, 92 कोटी लोकांची NDA ला साथ, पहा नकाशात काय स्थिती

दिल्लीत भाजपाने मिळविलेल्या मोठ्या विजयानंतर आता देशातील 21 राज्यात एनडीएचा भगवा फडकत आहे. साल 2018 मध्ये 20 राज्यात भाजपाचे राज्य होते. त्यानंतर त्यांचा आलेख घसरला. आता भाजपाने आपलाच रेकॉर्ड तोडत 21 राज्यात सत्ता मिळविली आहे.

पहिल्यांदाच 21 राज्यात भाजपा, 92 कोटी लोकांची NDA ला साथ, पहा नकाशात काय स्थिती
For the first time, BJP in 21 states, 92 crore people support NDA, see what is the situation in the map
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 9:05 PM

दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय नकाशा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी देशाच्या 19  राज्यात आणि दोन केंद्र शासित प्रदेशात एनडीए सरकारचे राज्य शासन आहे. 21 पैकी सहा राज्यात एनडीएच्या सहकारी पक्षांची सत्ता आहे. तर 15  राज्यात भाजपाच्या हाती सत्तेचे सुकाणू आहे. एवढेच नाही तर देशाचील राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर एनडीएकडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता हाती आली आहे.

टॉप-5 मधील 3 राज्यांत भाजपाचा कब्जा

एनडीएच्याजवळ आता देशातील पाच मोठ्या राज्यांपैकी ( यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडु ) तीन राज्यात सरकार आहे. युपी आणि महाराष्ट्रात भाजपाचा स्वत:चा मुख्यमंत्री आहे. तर बिहारमध्ये भाजपाचे मित्र पक्ष जेडीयूचे नितीश कुमार यांच्या हाती सत्ता आहे.

हे सुद्धा वाचा

नॉर्थ-ईस्टच्या 7 पैकी सहा राज्यात एनडीएचा कब्जा आहे. नॉर्थ – ईस्टच्या केवळ मिझोरममध्ये एनडीएची सरकार आहे. याच प्रकारे डोंगराळ प्रदेश असलेल्या तीन राज्यांपैकी (जम्मू-कश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल ) एका राज्य उत्तराखंड येथे भाजपाची सत्ता आहे. जम्मू कश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला तर हिमाचल प्रदेशात कांग्रेसचे सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री आहेत.

 BJP in 21 states, 92 crore people support NDA

BJP in 21 states, 92 crore people support NDA

मध्य आणि पश्चिम भारतात एनडीएचा दबदबा

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह महाराष्ट्र आणि गुजरात येथे देखील बीजेपीचे सरकार आहे. 2022 मध्ये गुजरात आणि 2023 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपाचा विजय झाला होता. महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये भाजपाप्रणीत एनडीएचा विजय झाला.

याच प्रकारे उत्तर भारतात बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएचा कब्जा आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीची सरकार आहे. तर दक्षिण भारतातील पाच पैकी चार राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आहे.केरळ, तेलंगाना, कर्नाटक आणि तामिळनाडुत इंडिया आघाडीचे सरकार आहे तर आंध्रप्रदेशात एनडीएची सरकार आहे.

140 कोटी लोकसंख्या, 92 पर NDAचं शासन

देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे. दिल्लीच्या विजयानंतर एनडीएचे शासन 92 कोटी लोकांवर आहे. 10 कोटीहून अधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेश (24 कोटी ), महाराष्ट्र (12 कोटी ) आणि बिहार मध्ये (12 कोटी )  एनडीएचे राज्य आहे. 10 कोटी किंवा त्याहून जादा लोकसंख्या असलेल्या कोणत्याही मोठ्या राज्यात इंडिया आघाडीचे सरकार नाही.

पहल्यांदा 21 राज्यात एनडीएचे सरकार

साल 2018 च्या मध्यात भाजपा सत्तेच्या सारीपाठावर आघाडीवर होती. त्यावेळी २० राज्यात भाजपाचे राज्य होते. यात पूर्वोंत्तर येथील सर्व 7 राज्यांशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्या सरकारचा समावेश होता. त्यानंतर भाजपाचा आलेख घसरला. सात वर्षांनंतर आता भाजपाने आपलाच २० राज्यांचा रेकॉर्ड तोडत २१ राज्यात सत्ता मिळविली आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.