AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash: धक्कादायक… पहिल्यांदाच घडलं… एअर इंडियाने 12 मृतांच्या कुटुंबियांना दिले दुसऱ्यांचे मृतदेह

गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 269 लोकांचा मृत्यू झाला होता.आता एअर इंडियाने लंडनमधील पीडिताच्या कुटुंबियांना 12 चुकीचे मृतदेह पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे.

Ahmedabad Plane Crash: धक्कादायक... पहिल्यांदाच घडलं... एअर इंडियाने 12 मृतांच्या कुटुंबियांना दिले दुसऱ्यांचे मृतदेह
ahmedabad air india crash
| Updated on: Jul 23, 2025 | 5:15 PM
Share

गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 269 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच आता एअर इंडियाने लंडनमधील पीडिताच्या कुटुंबियांना 12 चुकीचे मृतदेह पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. लंडनमधील तपासणीतून ही माहिती समोर आली आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळ्याने ज्यामध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 269 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 52 ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. हा अपघात इतका भीषण होता की, बरेच मृतदेह जळलेल्या अवस्थेत होते, त्यामुळे त्यांनी ओळख पटवणे कठीण होते. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबांकडे पाठवण्यात आले.

ब्रिटिश नागरिकांचे मृतदेह लंडनमध्ये पोहोचल्यानंतर मृतदेहांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी डीएनए जुळवला तेव्हा ते मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे समोर आले. हे तब्बल 12 मृतदेहांसोबत घडले. मृतदेह बदलण्यात आल्याचे समोर आल्यानंतर अनेक कुटुंबांना अंत्यसंस्कार कार्यक्रम रद्द केल्याची माहितीही समोर आली आहे.

12 मृतदेहांचे अवशेष परत पाठवले

याबाबत बोलताना वकील जेम्स हीली प्रॅट यांनी सांगितले की, ’12 ब्रिटिश नागरिकांच्या मृतदेहांचे अवशेष परत पाठवण्यात आले आहेत. मी एका महिन्यापासून ब्रिटिश कुटुंबांच्या घरी आहे, या लोकांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. मात्र अनेकांना त्यांच्या प्रियजनांचे अवशेष मिळालेले नाहीत, काहींना मृतदेह मिळाले आहेत मात्र ते दुसऱ्याचे आहेत. हा मोठा निष्काळजीपणा आहे, याबाबत कुटुंबांना स्पष्टीकरण मिळायला हवे.’

इतरांनाही चुकीचे मृतदेह?

वकील हीली यांनी पुढे बोलताना म्हटले की, 12 नातेवाईकांना चुकीचे मृतदेह मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, हे मृतदेह दुसऱ्या व्यक्तीचे आहेत तर मग या लोकांचे मृतदेह कुठे आहेत? यामुळे दुसऱ्या नातेवाईकांनाही चुकीचे मृतदेह तर गेले नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होते आहे.

एका शवपेटीत दोन व्यक्तींचे मृतदेह

आणखी एक बाब म्हणजे, एकाच शवपेटीत एकापेक्षा जास्त व्यक्तींचे मृतदेह ठेवण्यात आले असल्याचीही माहिती समोर आली आहे. हे मृतदेह अंतिम संस्कारापूर्वी वेगळे करण्याते आले आणि मृतदेहांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या धर्मानुसार त्यांना दफन करण्यात आले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.