AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदार यादीत 30 हजार रोहिग्यांची नोंद होईपर्यंत अमित शाहांनी झोपा काढल्या काय? : ओवेसी

मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्याची नोंद असेल तर आतापर्यंत देशाचे गृहमंत्री अमित शाह काय झोपा काढत होते का?, असा बोचरा सवाल एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे.

मतदार यादीत 30 हजार रोहिग्यांची नोंद होईपर्यंत अमित शाहांनी झोपा काढल्या काय? : ओवेसी
| Updated on: Nov 24, 2020 | 1:58 PM
Share

नवी दिल्ली :  रोहिंग्यांच्या (Rohingyas) मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि एमआयएम(AIMIM) सामनेसामने आले आहेत. जर मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्याची नोंद असेल तर आतापर्यंत देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काय झोपा काढत होते का?, असा बोचरा सवाल एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी    (Asaduddin Owaisi ) यांनी विचारला आहे. (AIMIM Asaduddin owaisi Attacked Amit Shah Over Rohingyas)

असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाह यांना चॅलेंज दिलं आहे. जर मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्याची नोंद असेल तर त्यातील 1 हजार नावे मला गृहमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंत द्यावीत, असं आव्हान ओवेसींनी दिलं. हैदराबाद महापालिका निवडणुकीचा (Greater Hyderabad Municipal Corporation Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात दोन्हीही बाजूने आरोप प्रत्यारोपांची राळ उडताना दिसून येत आहे.

“भाजपचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये फूट पाडण्याचा आहे. द्वेष निर्माण करणं हे भाजपचं काम आहे. त्यासाठी ते काहीही करतील”, अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली. तसंच ही निवडणूक हैदराबाद विरुद्ध भाग्यनगर अशी आहे, असं ते म्हणाले.

तत्पूर्वी कर्नाटक भाजपचे युवा नेते तथा खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘मोहम्मद अली जिनांची भाषा बोलणाऱ्या असदुद्दीन ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत देशविरोधी आहे तसंच ज्या मुल्यांवर भारत देश उभा आहे, त्या मुल्यांविरोधात ओवेसींना होणारं मतदान आहे’, असं तेजस्वी सूर्या म्हणाले.

ओवेसींच्या तोंडी जिनांची भाषा, भाजपची टीका

ओवेसी इस्लामवाद, फुटीरतावाद आणि जिन्नांसारख्या अतिरेकीपणाची भाषा बोलतात. देशातील प्रत्येक नागरिकाने ओवेसींच्या फूट पाडणाऱ्या आणि जातीयवादी राजकारणाविरोधात उभे राहिले पाहिजे, अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी केली. येत्या 1 तारखेला होणाऱ्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून दक्षिणेत भाजप आपलं द्वार उघडणार असल्याचा विश्वास देखील सूर्या यांनी व्यक्त केला.

आज हैदराबाद बदला, उद्या तेलंगणा बदलेल

आज हैदराबाद बदला, उद्या तेलंगणा बदलेल, परवा दक्षिण भारत बदलेल. संपूर्ण देश हैदराबादकडे पाहत आहे. तेलंगणात पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेला भाजप आता महापालिका निवडणुकीत आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांच्यासह प्रमुख नेत्यांवर ही कमान सोपवण्यात आली आहे.

(AIMIM Asaduddin owaisi Attacked Amit Shah Over Rohingyas)

संबंधित बातम्या

जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या

ममता बॅनर्जींचा असदुद्दीन ओवेसींना झटका, अनेक नेत्यांचा MIM ला रामराम ठोकत TMC मध्ये प्रवेश

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.