AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायूसेनेला लवकरच मिळणार दोन तेजस मार्क-1 ए जेट फायटर, पाहा काय योजना

एलसीए मार्क-1 ए एअरफोर्सच्या मिग-21 च्या जागी ताफ्यात घेतले जात आहे. हे भारताचे आत्मनिर्भरता आणि मेक इन इंडियाचे मोठे पाऊल मानले जात आहे. पाकिस्तानच्या राजस्थानच्या जवळील एअरबेसवर स्थापन करण्याची योजना आहे.

वायूसेनेला लवकरच मिळणार दोन तेजस मार्क-1 ए जेट फायटर, पाहा काय योजना
| Updated on: Aug 31, 2025 | 4:37 PM
Share

भारतीय वायूसेनेला सप्टेंबर महिन्यात दोन तेजस मार्क-1 ए मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)भारतीय वायूसेनेला दोन तेजस मार्क 1 ए लढावू विमाने देऊ शकते असे भारताचे संरक्षण सचिव आर.के.सिंह यांनी सांगितले. या विमानांना वेपन्स इंटीग्रेशन म्हणजे शस्रास्रे जोडण्यात आली आहे. यावेळी आर.के.सिंह यांनी सांगितले की सरकार HAL बरोबर 97 आणखी तेजस खरेदी करण्याचा करार करणार आहे. ज्याची अंदाजित किंमत 67,000 कोटी रुपये आहे. सध्या 38 तेजस जेट फायटर विमाने वायूसेनेत सामील आहेत.

याआधी न्यूज एजन्सी एएनआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी भारतीय वायूसेनेसाठी ( IAF)97 LCA मार्क 1A फायटर जेट खरेदी करण्यासाठी 62 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. वास्तविक फेब्रुवारी 2021मध्ये सरकारने HAL सोबत 83 तेजस मार्क -1 ए खरेदीसाठी 48,000 कोटींचा करार केलेला होता. परंतू HAL ला अमेरिकन इंजिन डीलिव्हरी होण्यास उशीर झाल्याने आतापर्यंत एकही विमान सोपवलेले नाही. परंतू आशा निर्माण झाली आहे की साल 2028 पर्यंत HAL सर्व विमाने वायूसेनेला सोपवणार आहे.

LCA मार्क 1A तेजस एअरक्राफ्टचे एडव्हान्स व्हर्जन आहे. या अपग्रेडेड एवियॉनिक्स आणि रडार सिस्टीम लावलेली आहे. LCA मार्क-1A चे 65 टक्के उपकरणं भारतात तयार झालेली आहेत. तेजसला देखील HAL ने विकसित केले आहे. हे सिंगल इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे.

HALच्या जवळ 83 एअरक्राफ्ट्सची डीलिव्हरी करण्यासाठी 2028 पर्यंतचा वेळ आहे. HALचे चेअरमन आणि मॅनेजमेंट संचालक डी.के सुनील यांनी सांगितले की डिलिव्हरीला झालेल्या उशीर यामागे इंडस्ट्रीला जबाबदार धरले जात होते. परंतू या दिरंगाईला तांत्रिक त्रूटी जबाबदार आहे. यास आता दूर केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंगळुरुत तेजस फायटर प्लेनमध्ये 25 नोव्हेंबर 2022 मध्ये उड्डान घेतले होते. कोणाही भारतीय पंतप्रधानांनी तेजसमधून घेतलेले हे पहिले उड्डाण आहे. तेजसमधून उड्डाण भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरु स्थित हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL ) ला भेट दिली होती.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा