AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, तात्काळ लँडिंग; 156 प्रवाशी पुन्हा हादरले

एक फोन आला आणि एअर इंडिया विमानाचे तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, तात्काळ लँडिंग; 156 प्रवाशी पुन्हा हादरले
AirIndiaImage Credit source: Tv9 Network
Updated on: Jun 13, 2025 | 12:06 PM
Share

शुक्रवारी थायलंडच्या फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 379 या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर विमानाचे थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानातील 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानाने अंदमान समुद्रावर चक्कर मारल्यानंतर फुकेत विमानतळावर परत लँडिंग केले. धमकी देणाऱ्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही घटना अहमदाबाद दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी घडली आहे.

एक अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लाइट AI 379 लँड झाले आहे आणि विमानतळ आपत्कालीन सेवेसह पुढील कार्यवाही करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, थाई बेट फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. माहिती मिळताच तात्काळ आपत्कालीन लँडिंग करवण्यात आले.

वाचा: मोठी बातमी! 2 पक्षांमुळे 50 प्रवाशांचा मृत्यू, अहमदाबाद विमान अपघातामागील धक्कादायक कारण आलं समोर

लँडिंगनंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षिततेसाठी खाली उतरवण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण विमानाची बारकाईने तपासणी केली जात आहे. विमानाने शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता (0230) फुकेत विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. परंतु अंदमान समुद्राजवळ धमकी मिळाल्याने ते परत लँड करवण्यात आले.

इराण-इस्त्रायल युद्धामुळे परतले विमान

इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी आपापली हवाई क्षेत्रे बंद केली आहेत. यामुळेच भारतातून जाणारी अनेक विमाने मार्ग बदलली गेली आहेत, तर काही विमाने परत राजधानी दिल्लीला परतत आहेत. याबाबत एअर इंडियाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले आहे.

भ्रष्टाचार वाढला आहे, अण्णा हजारेंना उठवायची गरज; संजय राऊतांची टीका
भ्रष्टाचार वाढला आहे, अण्णा हजारेंना उठवायची गरज; संजय राऊतांची टीका.
लोणावळ्याचा फेमस वडापाव तुम्ही खाताय? थांबा, कारण उंदरांनी चावलेल्या..
लोणावळ्याचा फेमस वडापाव तुम्ही खाताय? थांबा, कारण उंदरांनी चावलेल्या...
टेस्लाची भारतात दमदार एन्ट्री, मुंबईतील पहिल्या शोरूमची पाटी मराठीत
टेस्लाची भारतात दमदार एन्ट्री, मुंबईतील पहिल्या शोरूमची पाटी मराठीत.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी तुडवल, बघा VIDEO
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी तुडवल, बघा VIDEO.
राजीनामा दिलाच नाही... भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटलांचं भाष्य
राजीनामा दिलाच नाही... भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटलांचं भाष्य.
गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले...
गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले....
कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर... विरोधकांना राणेंचं चॅलेंज काय?
कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर... विरोधकांना राणेंचं चॅलेंज काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम? राज ठाकरे स्पष्टच म्हणाले...
ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम? राज ठाकरे स्पष्टच म्हणाले....
Saamana : बहिणींची 'लाडकी' योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी 'दोडकी'
Saamana : बहिणींची 'लाडकी' योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी 'दोडकी'.
येमेनमध्ये भारतीय नर्सच्या निमिषा प्रियाला होणार फाशी, उरला एकच दिवस
येमेनमध्ये भारतीय नर्सच्या निमिषा प्रियाला होणार फाशी, उरला एकच दिवस.