AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Plane Crash Video : 2 सेकंदांचा खेळ, अन् मोठा स्फोट, विमान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर!

अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. कोसळलेलं AI171 हे विमान एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचं होतं. 

Air India Plane Crash Video : 2 सेकंदांचा खेळ, अन् मोठा स्फोट, विमान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर!
air india plane crash video
| Updated on: Jun 12, 2025 | 3:07 PM
Share

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. कोसळलेलं AI171 हे विमान एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचं होतं.  टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत हे विमान कोसळलं. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 242 प्रवासी होते. अहमदाबादहून हे विमान लंडनला जात होते. दरम्यान, हे विमान कोसळल्यानंतर या दुर्घटनेचा एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं? अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 242 प्रवासी होते. हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला जाणार होते. या विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून उड्डाण घेतले होते. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला हे विमान थेट जमिनीवर आदळले. हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या भागात घरे आहेत. विमान कोसळल्यानंतर त्याला लगेच आग लागली.

सगळीकडे धुराचे लोट, बचावकार्य चालू

या विमानाला दुर्घटना झाल्यानंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये धुराचे मोठे लोट दिसत आहेत. म्हणजचे अपघातानंतर या विमानाला लगेच आग लागली आहे. या विमानात 242 प्रवासी होते. अपघातग्रस्त विमानाचे नाव AI171 असे असून या अपघातात काही जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना घडताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. तसेच या दुर्घटनेत बचावकार्य करण्यासाठी केंद्र सरकाकडून पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन अमित शाहा यांनी दिले आहे.

एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण

विमान कोसळल्यानंतर एअर इंडियाने अधिकृतपणे माहिती दिली आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार AI171 हे विमान अहमदाबादहून-लंडनमधील गॅटविक येथे जात होते. या विमानाचा अपघात झाला आहे. सध्या या घडीला आम्ही या अपघाताविषयी अधिक माहिती घेत आहोत. हा अपघात कसा झाला? त्यामागची कारणं काय? याची माहिती आम्ही लवकरच देऊ, असं एअर इंडियाने सांगितलं आहे. सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार विमानाच्या पाठीमागचा भाग हा झाडाला अडकला होता, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असं सांगण्यात येतंय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.