AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेवरुन मुंबईला येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड, कोलकातामध्ये प्रवाशांना उतरवले

अमेरिकेवरुन मुंबईत येणाऱ्या विमानाचे कोलकातामध्ये लँडींग झाले. विमान AI 180 कोलकाता विमानतळावर मध्यरात्री 00.45 वाजता पोहचले. परंतु इंजिनातील बिघाडामुळे मुंबईकडे टेकऑफ घेऊ शकले नाही. सकाळी सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले.

अमेरिकेवरुन मुंबईला येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड, कोलकातामध्ये प्रवाशांना उतरवले
तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना कोलकाता येथे उतरवलेImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Jun 17, 2025 | 9:02 AM
Share

अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया कंपनीचे प्रवासी वाहतूक करणारे विमान टेक ऑफ नंतर लगेचच कोसळले. 12 जून रोजी घडलेल्या या घटनेत एकूण 270 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर गेल्या काही दिवसांत तांत्रिक बिघाड आणि सुरक्षेच्या कारणास्तव बोईंग विमानांना लँडींग करावी लागल्याच्या काही घटना घडल्या आहे. आता अमेरिकेवरुन मुंबईत येणाऱ्या विमानाचे कोलकातामध्ये लँडींग झाले. त्या ठिकाणी विमानास हॉल्ट होता. परंतु तांत्रिक बिघाडाच्या कारणामुळे प्रवाशांना मुंबई ऐवजी कोलकाता येथेच उतरवण्यात आले.

प्रवाशांना कोलकाता येथेच उतरवले

अहमदाबाद विमान अपघातानंतर हाँगकाँगवरुन दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणादरम्यान मध्येच उतरवावे लागले होते. आता अमेरिकेवरुन मुंबईला येणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोलकाताला थांबवण्यात आले. अमेरिकेतील सॅन फ्रॉसिस्कोवरुन कोलकाता मार्गाने हे विमान मुंबईत येणार होते. परंतु इंजिनात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे मंगळवारी सकाळी कोलकोता विमानतळावर प्रवाशांना उतरवण्यात आले.

विमान AI 180 कोलकाता विमानतळावर मध्यरात्री 00.45 वाजता पोहचले. परंतु इंजिनातील बिघाडामुळे मुंबईकडे टेकऑफ घेऊ शकले नाही. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना सकाळी 05.20 उतरण्याचे सांगण्यात आले. विमानाचे पायलट यांनी सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेत असल्याचे प्रवाशांना सांगितले.

ड्रिमलायनरमध्ये बिघाडाच्या घटना

हाँगकाँगवरुन दिल्लीला येणारे विमान तांत्रिक बिघाडानंतर पुन्हा हाँगकाँगला नेण्यात आले होते. तसेच ब्रिटीश एअरवेजच्या ड्रिमलायनर विमानातही रविवारी तांत्रिक बिघाड आल्याचे समोर आले होते. टेकऑफनंतर अवघ्या दोन तासांतच हिथ्रो विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले. चेन्नई जाणारे हे विमान होते. तसेच फ्रँकफर्टहून हैदराबादला येणारे लुफ्थांसाचे विमान बॉम्बच्या धमकीमुळे जर्मनीला परत पाठवावे लागले. ही दोन्ही विमाने देखील बोईंग ड्रिमलाइनर होती. अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानात बिघाडाचे कोणतेही अलर्ट आले तरी विमान कंपन्या त्वरीत अलर्ट होत आहे. गेल्या काही दिवसांतील सततच्या घटनांनंतर प्रवाशांमध्ये बोईंग विमानांबद्दल अस्वस्थता दिसून येत आहे.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.