AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजिंक्य शिंदेंच्या पहिल्याच व्हिडीओने खळबळ, दीपकेंना ताब्यात घेताच मोठं आवाहन; जिथे असाल तिथे…

लोक जंतर-मंतर मैदानावर पोहोचू नयेत म्हणून सरकारने बसेस बंद केल्या. ट्रेन बंद केल्या. दिल्लीत येणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. मोदी शाह यांची भीती म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकल्याचं द्योतक आहे, अशी टीका अजिंक्य शिंदे यांनी केली.

अजिंक्य शिंदेंच्या पहिल्याच व्हिडीओने खळबळ, दीपकेंना ताब्यात घेताच मोठं आवाहन; जिथे असाल तिथे...
abhijeet dipke and ajinkya shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 4:16 PM
Share

Ajinkya Shinde : सध्या राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप आलंय. कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने केलेल्या आवाहनानंतर हजारो लोक दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पोहोचत आहेत. लोकांनी एकत्र जमू नये म्हणून पोलिसांकडून कारवाई केली जातेय. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यूट्यूबर ध्रुव राठी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोबतच सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता या आंदोलनाचे नेतृत्त्व सीजपीचे अजिंक्य शिंदे करत आहेत. त्यांनी अभिजीत दीपके यांची जागा घेतलीय. असे असतानाच आता अजिंक्य शिंदे यांनी देशातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

तुम्ही हा व्हिडीओ पाहात असाल तर…

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांचा एक व्हिडीओ सीजेपीने पोस्ट केला. या व्हिडीओत दीपके यांनी अजिंक्य शिंदे दिल्लीच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करतील असे सांगितले. “तुम्ही हा व्हिडीओ पाहात असाल तर आम्ही अटक झालेलो आहोत असं समजावे. आमच्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्त्व अजिंक्य शिंदे करतील. मी सर्वांनाच आवाहन करतो की अजिंक्य शिंदे जे सांगतील त्याचे पालन करावे,” असे आवाहनही दीपके यांनी व्हिडीओत केले आहे.

सरकार देशाच्या एकजुटतेला पुन्हा एकदा घाबरलं

या व्हिडीओनंत अजिंक्य शिंदे यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत त्यांनी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जमावे, असे आवाहन केलेय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केलीय. “अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास या तिघांना मोदी, शाह यांच्या हुकूमशाही सरकारने ताब्यात घेतलं. दिल्लीच्या विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. हे हुकूमशाही सरकार देशाच्या एकजुटतेला पुन्हा एकदा घाबरलं आहे. गेल्या वेळीदेखील संपूर्ण देश दिल्लीच्या जंतर-मंतरवर एकत्र आला होता. त्यावेळी आपण मोदी-शाह यांचा अहंकार धुळीस मिळवला होता,” असा हल्लाबोल अजिंक्य शिंदे यांनी केला.

आता नव्या लढाईला सुरुवात

तसेच, लोक जंतर-मंतर मैदानावर पोहोचू नयेत म्हणून सरकारने बसेस बंद केल्या. ट्रेन बंद केल्या. दिल्लीत येणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. मोदी शाह यांची भीती म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकल्याचं द्योतक आहे. आता नव्या लढाईला सुरुवात झाली आहे. ज्या लोकांचा मतदानाचा अधिकार चोरीला गेलेला आहे तो परत मिळावा हीच आमची मागणी आहे, अशी भूमिकाही शिंदे यांनी मांडली.

संपूर्ण दिल्लीत आणीबाणी लागू केली- अजिंक्य शिंदे

यासह ज्या ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी केली, त्यांचाच फक्त राजीनामा मागितला जात आहे. परंतु हुकूमशाही सरकारने संपूर्ण दिल्लीत आणीबाणी लागू केली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मी एकच आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर या. ज्या ठिकाणी तुम्हाला पोलिसा आडवतील त्याच जागेला जंतर-मंतर करा. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत ही लाढाई सुरूच राहील, असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव