Narendra Giri Death | अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

Narendra Giri | प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी (Narendra Giri Death) यांची संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत.

Narendra Giri Death | अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 7:28 PM

लखनऊ : प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी (Narendra Giri Death) यांची संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची बातमी येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच आयजी केपी सिंह तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीदेखील नरेंद्र गिरी यांचा मृतदेह ज्या ठिकाणी फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला त्या ठिकाणाची पाहणी केली.

पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह एका पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. तसेच ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेला होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

नरेंद्र गिरी मागील अनेक दिवसांपून मानसिक ताणवाखाली

मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र गिरी महाराज मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावतून जात होते. रविवारी गिरी यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतली होती. मागील अनेक दिवसांपासून गिरी यांचा त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी वाद सुरु होता. नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना त्यांच्या आश्रमातून बाहेर काढलं होतं. हा वाद संपल्यानंतर आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांची माफी मागितली होती.

देव हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो- अखिलेश यादव

महंत नरेंद्र गिरी यांचे निधन झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी देव हे दु:ख पचवण्याची शक्ती प्रदान करो, असे म्हटलं आहे. तसेच गिरी यांचे निधन ही आमच्यासाठी मोठी हानी आहे. गिरी यांच्या आत्म्याला शांती मिळो, असेही यादव म्हणाले आहेत.

इतर बातम्या :

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटलांना संधी, प्रज्ञा सातव यांना विधानसभा की विधान परिषद?

Rajya Sabha : राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा

राज्यसभेचा उमेदवार जाहीर करुन भाजपनं प्रथा मोडली?, थोरातांनी महाजनांची आठवण करून दिली, काँग्रेस भाजपला विनंती करणार?

(akhil bharatiya akhada parishad president mahant narendra giri died body found in suspicious condition)

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.