AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Court : हलालाच्या नावाखाली सामूहिक बलात्कार, हायकोर्टाने कठोर शब्दात फटकारलं, ट्रिपल तलाकच्या आडून तुम्हाला..

High Court : FIR नुसार एप्रिल 2015 मध्ये पीडितेला मुख्य आरोपी अजहर नवाजसोबत निकाह करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. त्यावेळी तिचं वय 15 वर्ष होतं. आरोपीने तिला जानेवारी 2016 मध्ये ट्रिपल तलाक दिला.

High Court : हलालाच्या नावाखाली सामूहिक बलात्कार, हायकोर्टाने कठोर शब्दात फटकारलं, ट्रिपल तलाकच्या आडून तुम्हाला..
Allahabad High court
| Updated on: Jul 03, 2026 | 3:24 PM
Share

अलाहाबाद हायकोर्टाने निकाह, हलाला आणि ट्रिपल तलाक सारख्या प्रथांवर कठोर टिप्पणी केली आहे. या प्रथांच्या आडून महिला लैंगिक शोषणाला परवानगी दिली जाऊ शकत नाही असं अलाहाबाद हाय कोर्टाने म्हटलं आहे. अशा प्रथा म्हणजे समाजासाठी काळं पान आहे अशी टिप्पणी कोर्टाने केली. या अशा प्रथा संवैधानिक मूल्य, समानता आणि मानवी प्रतिमा या विरुद्ध आहेत. अशी कृत्य म्हणजे केवळ कायदेशीर गुन्हा नाही, तर समाजाच्या सामूहिक अंतरात्म्याला हादरवून सोडणाऱ्या या गोष्टी आहेत.

न्यायमुर्ती जे.जे. मुनीर आणि न्यायमूर्ती तरुण सक्सेना यांच्या खंडपीठाने पीडितेचा पूर्व पती, काका, मौलाना सह अन्य आरोपींच्या याचिका फेटाळून लावल्या. व्यक्तिगत कायद्याच्या आडून गुन्ह्यांना संरक्षण देता येणार नाही अशी टिप्पणी हायकोर्टाने केली. न्यायालयाने प्राथमिक दृष्टया अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा मुद्दा मान्य केला. सखोल चौकशीची गरज असल्याचं न्यायालयाने म्हटलं.

समोर आलेल्या गोष्टी गंभीर

अमरोहा सैदनागली क्षेत्रातील हे प्रकरण आहे. पीडितेने कमी वयात निकाह, ट्रिपल तलाक, हलाला आणि पुन्हा निकाहच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आरोपींनी खटला रद्द करावा तसच अटकेला स्थगिती द्यावी या मागण्यांसाठी याचिका दाखल केली होती. कोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या. आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टी गंभीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. प्राथमिक दृष्ट्‍या सर्व आरोपींची भूमिका ही कायद्याच्या विरोधात दिसते. चौकशीच्या प्राथमिक टप्प्यात एफआयआर रद्द करण्याच्या मागणीला काहीही आधार नाही हे कोर्टाने स्पष्ट केलं.

हलालाच्या नावाखाली बलात्कार

आरोपांवरुन लगेच लक्षाय येतं की, पीडिता अल्पवयीन असताना तिच्यावर बलात्कार झाला. त्यानंतर एकदा सामूहिक बलात्कार झाला. हलालाच्या नावाखाली ती गोष्ट लपवण्यात आली आहे असं कोर्टाने म्हटलं. आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे असं मत कोर्टाने व्यक्त केलं.

हे प्रकरण काय आहे

FIR नुसार एप्रिल 2015 मध्ये पीडितेला मुख्य आरोपी अजहर नवाजसोबत निकाह करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. त्यावेळी तिचं वय 15 वर्ष होतं. आरोपीने तिला जानेवारी 2016 मध्ये ट्रिपल तलाक दिला. काही महिन्यांनी नवाजची पुन्हा तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा झाली. त्यावेळी नोव्हेंबर 2016 मध्ये सह आरोपी मौलान कयूम सोबत तिचा निकाह हलाला झाला.

हलालाच्यावेळी पीडितेच वय 16 वर्ष होतं. पीडितेने मॅजिस्ट्रेट समोर सांगितलं की, तिला त्यावेळी हलालाचा अर्थ सुद्धा माहित नव्हता. तिने सांगितलं की, तिच्यासोबत बलात्कार झाला. 2017 मध्ये नवाज सोबत पुन्हा तिचा निकाह झाला. पण चार वर्षांनी नवाजने तिला पुन्हा घटस्फोट दिला आणि दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ