नोटबंदीनं अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त, लाखो बेरोजगार झाले : अमर्त्य सेन

नोटबंदीनं अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त, लाखो बेरोजगार झाले : अमर्त्य सेन

जागतिक दर्जाचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर जोरदार हल्ला चढवलाय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 06, 2021 | 2:27 AM

पुणे : जागतिक दर्जाचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर जोरदार हल्ला चढवलाय. “कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागल्यामुळे देशातील सामान्य माणसांचे प्रचंड हाल झाले. या काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार या नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही देऊ शकलं नाही,” असं मत अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं. ते राष्ट्र सेवा दलाच्या (Rashtra Seva Dal) ‘फ्राय डे फ्लेम’ (Friday Flame) या कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्र सेवा दला तर्फे सध्या कोरोनाचे बळी ठरलेल्यांच्या स्मरणार्थ फ्राय डे फ्लेम अंतर्गत ऑनलाईन आदरांजली आणि निर्धार सभांचे आयोजन करण्यात येतंय (Amartya Sen and Rajmohan Gandhi criticize Modi government over handling of Corona situation).

अमर्त्य सेन यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर हल्ला चढवला. अमर्त्य सेन म्हणाले, “कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागले आणि देशातील सामान्य माणसांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले. कोरोना काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार आरोग्याच्या प्राथमिक सोई नागरिकांना उपलबध करून देऊ शकले नाही. पंतप्रधानानी लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरात बसायला सांगितलं, पण लोकांना नोकऱ्या नाहीत, उत्पन्नाची साधनं नाहीत याकडे दुर्लक्ष केलं. स्थलांतरित मजुरांचे खूप हाल झाले. अगोदरच नोट बंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. काळा पैसा येईल म्हणून हा उपद्व्याप केला होता. पण काळा पैसा आला नाही. उलट उद्योग धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त झाली. लाखो रोजगार गेले. बेरोजगारी वाढली.”

“भारतात समान लस धोरण नाही ही खेदाची बाब”

“यानंतर कोरोनाने कहर केला. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात भारताची खूप पीछेहाट झालीय. सध्या भारतात समान लस धोरण नाही, ही खेदाची बाब आहे. दुसऱ्या बाजूला भारतात विद्वत्तेच्या पडझडीचे संकट आहे. सध्याचे सरकार भारताचा खरा स्वभाव ओळखू शकले नाही म्हणून या समस्या तयार झाल्या आहेत. भारताने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी चीन आणि साऊथ कोरियापासून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. भारतात हेल्थकेअर, सोशल कोएलिशन आणि अर्थकारण यांची केंद्र सरकारने वाईट अवस्था केली आहे,” असं मत अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं.

“गांधींचा सेक्युलॅरिझम आणि आंबेडकरांचा जातिनिर्मूलनाचा विचार भारतीयांना मार्गदर्शक”

महात्मा गांधी यांनी दिलेला सेक्युलॅरिझमचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला जातिनिर्मूलनाचा धडा भारतीयांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरेल याचीही शेवटी सेन यांनी आठवण करून दिली.

“देशात सध्या 1946-47 प्रमाणे द्वेषाचं वातावरण”

यावेळी बोलताना महात्मा गांधी यांचे नातू आणि प्राध्यापक राजमोहन गांधी म्हणाले, “1946-47 साली देशात जे सामाजिक वातावरण होतं तसंच द्वेषाचं वातावरण आज आहे. या वातावरणातून देश वाचवायचा असेल, तर हा देश सर्वांचा आहे, हिंसेचे तांडव माजवून कोणताही धर्म वाचणार नाही हा विचार उराशी बाळगून जगणारांची संख्या वाढवली पाहिजे. बंगालच्या जनतेने भाजपला पराजित करून योग्य धडा शिकवलाय.”

या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त कपिल यांनी अमर्त्य सेन आणि राजमोहन गांधी यांचे आभार मानले. सेन आणि गांधी यांचे असणे भारतातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना प्रेरक असल्याचं मत यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केलं. 7 मे 2021 पासून सुरू असणाऱ्या फ्रायडे फ्लेम कार्यक्रमाचा सेन आणि गांधी यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला.

हेही वाचा :

अदानी-अंबानी 21 व्या शतकातील इंग्रज, भाजप त्यांच्याच हातात देश देतोय : डॉ. गणेश देवी

‘केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास’, गणेश देवींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवींवर गंभीर आरोप, राजीनाम्याच्या मागणीसह पुण्यात बेमुदत उपोषण

व्हिडीओ पाहा :

Amartya Sen and Rajmohan Gandhi criticize Modi government over handling of Corona situation

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें