AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजब माकड, न्हाव्याच्या दुकानात करतो व्हीआयपी मसाज, व्हायरल Video ची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Monkey Messages at Barber Shop: सोशल मीडियाच्या जगात केव्हा काय समोर येईल आणि काय चमत्कार दिसेल याचा आणि यांचा काही नेम नाही, असे तुम्हाला हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर वाटेल. अशी व्हीआयपी मसाज तुम्ही पाहिली नसेल.

अजब माकड, न्हाव्याच्या दुकानात करतो व्हीआयपी मसाज, व्हायरल Video ची सोशल मीडियावर तुफान चर्चा
माकडाचा व्हीआयपी मसाज
| Updated on: Sep 20, 2026 | 2:09 PM
Share

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ स्क्रोल होतात. पण काही आपले लक्षचे वेधून घेत नाहीत तर आपल्याला क्षणभर धक्का देतात. समाज माध्यमांवर एक व्हिडिओ असाच धुमाकूळ घालत आहे. या मजेशीर व्हिडिओने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सध्या इंटरनेटवर एक नखरेबाज माकडाचा राजेशाही थाट आणि त्याची व्हीआयपी मसाज चर्चेचा विषय ठरली आहे. हे माकड न्हाव्याच्या दुकानातील खुर्चीवर मस्त लोळत मसाजचा आनंद लुटताना दिसतं आहे. माकडाचा हा राजेशाही थाट पाहून नेटीझसन्स आणि सलोनबाहेरील लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या व्हिडिओमध्ये नक्की काय?

एक्समध्ये शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, हे माकड न्हाव्याचा दुकानातील खुर्चीवर मस्त लोळत असल्याचे दिसते. न्हावी दादा त्याच्या डोक्याचा आणि चेहऱ्याचा मसाज करून देतो. तेव्हा हे माकड अत्यंत समाधानाने आणि शांतपणे या मसाजचा आनंद घेताना दिसते. डोळे मिटून ते मसाज करून घेताना दिसते. तर न्हाव्याला कुठं आणि कसं अंग दाबावं याच्या खाणाखुणाही ते त्याच्या हालचालींमधून करत असल्याचे या व्हिडिओतून दिसते. आता हा व्हिडिओ कुठलाही हे काही समोर आलेले नाही. त्याच्याविषयीचा काही दावाही करण्यात आलेला नाही. पण एखाद्या गावाकडील व्हिडिओ वाटत आहे. माकडाची भीती चेपलेली दिसते. ते ज्या पद्धतीने मसाज घेत आहे, त्यावरून त्याची आणि न्हाव्याची गट्टी असल्याचे दिसते.

नेटीझन्सकडून कमेंट्सचा पाऊस

माकडाची ही अनोखी मसाज पाहून उपस्थितांनाच नाही तर सोशल मीडियावरील युझर्सलाही आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडिओवर कौतुकाचा आणि गंमतीशीर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आजपर्यंत माणसांना सलोनमध्ये मसाज घेताना पाहिले पण माकडाचा असा व्हीआयपी थाट पहिल्यांदाच पाहिल्याची कमेंट एका युझर्सने केली आहे.

माकड आणि माणसांचे पूर्वज हे एकच असल्याची एक थेअरी आहे. सहा ते आठ दशलक्ष वर्षांपूर्वी दोन्हींचे पूर्वज एकच होते. या पूर्वजांपासून मानवाची एक शाखा उन्नत झाली. त्याला होमो सेफियन्स असे म्हटले जाते. मानवाच्या पूर्वजाने दोन पायावर चालायला सुरुवात केली आणि त्याची शेपूट झडली. तर चिपांझी आणि इतर वानर प्रजातीतही मोठे बदल झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वानरांचे, माकडांचे कळप हे मानवी वसाहतींभोवती असतात आणि मानवींशी त्यांचा संघर्ष उडतो तर कधी कधी प्रेमही दिसून येते.

माकडावरून मराठीत म्हणी

आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायला, माकडाला दारु पाजली आणि त्याला विंचू डसला – मूर्ख माणसासोबत राहिल्यास संकट ओढावते

माकडाची मैत्री जीवाला धोका- मूर्ख, अविचारी माणसांसोबत दोन हात दूर राहावे

उलटे टांगले माकड, म्हणाले जगच उलटे- मूर्ख माणूस हा त्याच्याच चष्म्यातून जग पाहतो

माकडाच्या हाती कोलीत – मूर्ख माणसाच्या हातात सत्ता दिल्यास, अधिकार दिल्यास त्याचे परिणाम उलेटच होतात

माकड चेष्टा- वायफळ कृती

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...