AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ

अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवसांनंतर युद्धविराम झाला आहे. यामध्ये पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र आता एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमुळे पाकिस्तानची चांगलीच पोलखोल झाली आहे.

US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ
America Iran ceasefireImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 5:23 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवसांनंतर युद्धविराम झाला आहे. बुधवारी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला. पाकिस्तानमुळे युद्धविराम घडवून आल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान चर्चेमध्ये आलं आहे. मात्र आता पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात फक्त औपचारिक चर्चाच नाही तर पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी देखील मोठ्या निर्णयाची पार्श्वभूमी तयार करतात. असाच डाव अमेरिकेने इराणसोबत युद्धविराम घडवून आणण्यासाठी टाकल्याचा पहायला मिळत आहे. इराणसोबत युद्धविराम घडवून आणण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानचं एक माध्यम म्हणून उपयोग केला आहे.

लंडनमधील वृत्तपत्र फायनांशियल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत थेट बोलणं टाळलं, त्याऐवजी त्यांनी पाकिस्तानला पुढं केलं. पाकिस्तानच्या माध्यमातून त्यांनी आपलं म्हणणं इराणपर्यंत पोहोचवलं. त्यांनी पाकिस्तानचा उपयोग एक असा संदेश वाहक म्हणून केला, की जो अमेरिकेच्या अटी आणि प्रस्ताव इराणपर्यंत पोहचू शकेल. या रिपोर्टमध्ये पुढे असा दावा देखील करण्यात आला आहे की, यामागे डोनाल्ड ट्रम्प यांची अशी रणनीती होती की, पाकिस्तान हा इराणचा शेजारी देश आहे, तसेच तो मुस्लिम बहुल देश आहे. त्यामुळे जर पाकिस्तानने अमेरिकेचा निरोप इराणपर्यंत पोहोचवला तर इराण त्याचा स्वीकार करू शकतो.

मात्र यामुळे आता पाकिस्तानच्या राजनैतिक स्वायत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या वृत्तपत्राने आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, युद्धविराम घडवून आणण्याची जबाबदारी अमेरिकेनं पाकिस्तानवर सोपावली, त्यासाठी गेले काही दिवस पाकिस्तानसोबत डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत गुप्तपणे चर्चा सुरू होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या खांद्यावर बंदुक ठेवून आपला उद्देश साध्य करून घेतला आहे.

या सर्वांमध्ये पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसीम मुनीर यांनी महत्त्वाची भूमिका होती, ते सातत्याने इराण आणि अमेरिकेच्या संर्पकात होते. इराणने स्ट्रीट ऑफ होमूर्ज पुन्हा एकदा सुरू करावा, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू होता, अखेर त्यासाठी त्यांनी पाकिस्तानला मध्यस्थ केलं, आणि त्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाली.

Follow Us
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?