AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा हादरा, बलाढ्य देश इराणच्या बाजुने थेट मैदानात, आता अमेरिकेनं हल्ला केला तर…

अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू युद्ध नौका आधीच मध्य पूर्वेमध्ये तैनात केल्या आहेत, त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते अशी परिस्थिती असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा हादरा, बलाढ्य देश इराणच्या बाजुने थेट मैदानात, आता अमेरिकेनं हल्ला केला तर...
donald trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 3:49 PM
Share

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे जर आमच्यावर एक जरी हल्ला झाला तर आम्ही याला आमच्या विरोधात सुरू केलेलं युद्ध मानू आणि आम्ही मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्व सैन्यतळांवर हल्ले करू अशी धमकी इराणकडून अमेरिकेला देण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेने आपल्या दोन सर्वात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्वेच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच झालंच तर त्याचा मोठा फटका हा कच्च्या तेलासाठी इराणवर अवलंबून असलेल्या अनेक देशांना बसणार आहे, यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.

दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, यामुळे इराणसोबत युद्धाच्या तैयारीमध्ये असलेल्या अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. आता रशिया इराणच्या मदतीला धावून आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर हिंद महासागर आणि ओमानच्या समुद्रात रशिया व इराण हे संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच जळफळाट झाला आहे, त्यामुळे हा वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकेने या भागात आधीच दोन सर्वात शक्तिशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत, तसेच इराण आणि रशिया यांच्या संयुक्त युद्ध सरावाची बातमी समोर येताच अमेरिकेने गेल्या 24 तासांमध्ये 50 पेक्षा अधिक फायटर जेट देखील पाठवले आहेत. त्यामुळे आता तणाव वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान इराणी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार इराण आणि रशिया गुरुवारी उत्तर हिंद महासागरात संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. एका रिपोर्टनुसार यावर बोलताना इराणचे नेव्ही कमांडर हसन मघसूदलू यांनी म्हटलं आहे की, या संयुक्त युद्धसरावाचा उद्देश हा दोन्ही देशांमधील ताळमेळ वाढवण्याचा आहे. सोबतच समुद्री दहशतवाद नष्ट करण्याचा आहे. अमेरिका आणि रशियाच्या संबंधांमध्ये देखील सध्या मोठा तणाव आहे, तसेच अमेरिका आता इराणवर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा स्थितीमध्ये आता इराण आणि रशिया एकत्र आल्याचं पहायला मिळत आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...