कापसापासून धागा तयार होतो? चरखा पाहून मेलानिया ट्रम्प आश्चर्यचकित

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (24 फेब्रुवारी) भारत दौऱ्यावर येताच साबरमती येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट दिली.

Donald and Melania Trump on Charakha, कापसापासून धागा तयार होतो? चरखा पाहून मेलानिया ट्रम्प आश्चर्यचकित

गांधीनगर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (24 फेब्रुवारी) भारत दौऱ्यावर येताच साबरमती येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट दिली (Donald and Melania Trump on Charakha). या भेटीत त्यांच्यासह त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प चरख्याच्या सहाय्याने कापसापासून धागा तयार होताना पाहून हरखून गेले. एका साध्या लाकडी चरख्यापासून कापसाचा धागा तयार होताना पाहून मेलानिया अगदी आश्चर्यचकित झाल्या.

अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला चरखा चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना चरखा चालवता आला नाही. यानंतर साबरमती आश्रमातील सहाय्यक लता बेन यांनी पंतप्रधान मोदींच्या सुचनेनुसार ट्रम्प दाम्पत्याला चरखा चालवण्यास शिकवले. चरख्याच्या मदतीने कापसापासून तयार होणारा धागा पाहून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया दोघेही हरखून गेले. उत्सुकता म्हणून मेलानिया यांनी लता बेन यांना अशाचप्रकारे कापसापासून धागे तयार होतात का असाही प्रश्न विचारला.

दरम्यान याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. आश्रमातून निघताच राष्ट्रपती ट्रम्प यांनी आश्रमाच्या व्हिजिटर बुकमध्ये आपला संदेश लिहिला. यामध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ट्रम्प यांनी लिहिलं की, “या अप्रतिम भारत भेटीसाठी माझे शानदार मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद.” विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हिजिटर बुकमध्ये आपला संदेश देताना महात्मा गांधी यांच्याबद्दल काहीही लिहिले नाही.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी प्रोटोकॉल तोडून ट्रम्प यांचं विमानतळावर जाऊन स्वागत केलं. यावेळी ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनेर देखील होते.

Donald and Melania Trump on Charakha

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *