AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय वायूदलाचे सामर्थ्य वाढले, चीनला भरणार धडकी; एकाचवेळी 10 ‘आकाश’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

चीनच्या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारताने लडाख परिसरात 'आकाश' आणि 'इगला' या दोन क्षेपणास्त्र प्रणाली कार्यरत केल्या आहेत. | Akash missiles

भारतीय वायूदलाचे सामर्थ्य वाढले, चीनला भरणार धडकी; एकाचवेळी 10 'आकाश' क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी
| Updated on: Dec 04, 2020 | 5:51 PM
Share

नवी दिल्ली: लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनविरुद्ध सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे मनोबल वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. चीनच्या हवाई हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी भारताने विकसित केलेल्या 10 आकाश क्षेपणास्त्रांची (Akash missiles)  एकाचवेळी झालेली चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. यापैकी बहुतांश क्षेपणास्त्रांनी आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. एकूणच या परीक्षेत आकाश क्षेपणास्त्राने चोख कामगिरी बजावली आहे. गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशातील सूर्यलंका परीक्षण तळावर ही चाचणी पार पडल्याचे समजते. (IAF testfires 10 Akash missiles to shoot down enemy fighter jets)

लडाखमध्ये ‘आकाश’ आणि ‘इगला’ क्षेपणास्त्र प्रणाली

लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून तणावाची परिस्थिती आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर या तणावात आणखीनच भर पडली होती. हा संघर्ष तीव्र झाल्यामुळे सध्या लडाखमध्ये भारत आणि चीन दोघांनीही मोठ्याप्रमाणावर सैन्य आणि युद्धसामुग्री तैनात केली आहे.

यामध्ये चीनच्या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारताने लडाख परिसरात ‘आकाश’ आणि ‘इगला’ या दोन क्षेपणास्त्र प्रणाली कार्यरत केल्या आहेत. या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे चीनची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सना भारतीय हद्दीत प्रवेश करणे जवळपास अशक्यप्राय आहे.

काय आहेत DRDO ने विकसित केलेल्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची वैशिष्ट्ये?

भारतीय संरक्षण व संशोधन संस्थेने (DRDO) विकसित केलेल्याआकाश क्षेपणास्त्रांमध्ये अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. आकाश क्षेपणास्त्र हे 30 किलोमीटरच्या परिघात आणि 19 किलोमीटर उंचीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.

या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेग जवळपास 4000 किमी प्रतितास इतका आहे. तर आकाश क्षेपणास्त्राची लांबी 5.8 मीटर व वजन 720 किलो आहे. एकावेळी या क्षेपणास्त्रातून तब्बल 60 किलो स्फोटके वाहून नेता येऊ शकतात. तसेच हे क्षेपणास्त्र स्वदेशी बनावटीच्या राजेंद्र रडार प्रणालीने सुसज्ज आहे.

आकाश प्रणालीच्या एका डिफेन्स सिस्टममध्ये चार लाँचर्स, एक रडार आणि प्रत्येक लाँचरवर तीन आकाश क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. यापैकी प्रत्येक लाँचर एकावेळी 16 लक्ष्यांवर नजर ठेऊ शकते. याचा अर्थ एक आकाश डिफेन्स सिस्टम एकावेळी 64 ठिकाणांवर नजर ठेवू शकते. रडारच्या एका इशाऱ्यावर 12 आकाश क्षेपणास्त्रे वेगवेगळ्या दिशांना असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

चीनला धडकी, भारताला लवकरच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार, रशियाचं आश्वासन

PHOTO: भारताचे ‘नाग’ क्षेपणास्त्र आता शत्रूची दाणादाण उडवण्यासाठी सज्ज

भारताकडून लडाखमध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्र तैनात, चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठी शस्त्रसज्जता

(IAF testfires 10 Akash missiles to shoot down enemy fighter jets)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.