भारतीय अंतराळ संशोधन आणि विकास (DRDO) संस्थेकडून गुरुवारी 'नाग' Nag anti tank guided missile या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली.
1 / 7
अद्यायावत तंत्रज्ञान असलेले नाग क्षेपणास्त्र कोणत्याही हवामानात लक्ष्याचा अचूक भेद करु शकते.
2 / 7
या क्षेपणास्त्रात इन्फ्रारेड सुविधा उपलब्ध आहे. टार्गेट लॉक केल्यानंतर अवघ्या काही क्षणांत नाग क्षेपणास्त्र लक्ष्याचा वेध घेते.
3 / 7
आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पोखरणमध्ये डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. आता लवकरच हे क्षेपणास्त्र लष्कराच्या सेवेत दाखल होईल.
4 / 7
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र यंत्रणा तयार करण्याच्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
5 / 7
सध्या चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाग क्षेपणास्त्र भारतीय लष्करात दाखल होणे, ही जमेची बाब मानली जात आहे.
6 / 7
गेल्या दीड महिन्यात भारताकडून या क्षेपणास्त्राच्या 12 चाचण्या पार पडल्या. या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या.