AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Kataria IAS: देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी…पगार घेतो केवळ 1 रुपया, पत्नी पायलट, संपत्ती किती?

Richest IAS Officer Amit Kataria: आयएएस अमित कटारिया यांची पत्नी अस्मिता हांडा कमर्शियल पायलट आहे. त्यांचा पगारही लाखोंमध्ये आहे. आयएएस अमित कटारिया सोशल मीडियावर नेहमी त्यांचे पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांना फिरण्याची चांगली आवड आहे.

Amit Kataria IAS: देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी...पगार घेतो केवळ 1 रुपया, पत्नी पायलट, संपत्ती किती?
IAS Amit Kataria
| Updated on: Nov 12, 2024 | 6:59 AM
Share

Richest IAS Officer Amit Kataria: आयएएस टीना डाबी, आयपीएस अमित लोढा यांच्यासारखे अधिकारी नेहमी चर्चेत असतात. या यादीत आयएएस अमित कटारिया यांचे नाव आहे. ते देशातील सर्वात श्रीमंत आयएएस अधिकारी आहे. ते पगार केवळ एक रुपया घेतात. त्यानंतर त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. हरियाणामधील गुरुग्राममध्ये राहणारे आयएएस अमित कटारिया सध्या छत्तीसगडमध्ये कार्यरत आहेत. ते गेल्या सात वर्षांपासून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहे.

2015 मध्ये आले होते चर्चेत

आयएएस अमित कटारिया छत्तीसगडमधील बस्तरमध्ये जिल्हाधिकारी असताना चर्चेत आले होते. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना त्यांनी काळा चष्मा घातला होता. ते सरकारी प्रोटोकॉलच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली गेली होती.

आयएएस अमित कटारिया देशातील टॉप 10 श्रीमंत अधिकारीच्या यादीत आहे. त्यांनी 2003 मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. त्यांना 18 रँक मिळाली होती. त्यानंतर त्यांना छत्तीसगड केडर मिळाले होते. त्यांचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झाले. आयआयटी दिल्लीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीटेक केले.

परिवाराचा रिअस एस्टेटचा व्यवसाय

अमित कटारिया यांचा परिवार उद्योगात आहे. त्यांचा रिअल एस्टेट आणि कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांचा व्यवसाय दिल्ली आणि जवळपास पसरलेला आहे. त्यांच्या परिवाराचे सदस्य हा व्यवसाय चालवतात. रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती आठ कोटींपेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये त्यांचा एकूण पगार 1.40 लाख रुपयांपेक्षा जास्त होता. परंतु ते केवळ एक रुपया घेतात. ते म्हणतात, मी नोकरीत आलो तेव्हाच ठरवले होते. माझी ही नोकरी देशसेवेसाठी आहे. मी केवळ एक रुपया पगार घेणार आहे.

पत्नी कमर्शियल पायलट

आयएएस अमित कटारिया यांची पत्नी अस्मिता हांडा कमर्शियल पायलट आहे. त्यांचा पगारही लाखोंमध्ये आहे. आयएएस अमित कटारिया सोशल मीडियावर नेहमी त्यांचे पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांना फिरण्याची चांगली आवड आहे.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.