नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या धोरणांचे देशात अनेक चाहते आहेत. अमित शाह यांची जीवनशैली अनेक जण फॉलो करण्याचा प्रयत्न करतात.अमित शाह यांनी पहिल्यांदा दाढी का वाढली? याचा उलगडा नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकार संमेलनात शनिवारी झाला. अमित शहा यांनी ज्यामुळे प्रतिज्ञा केली की आता मी माझी दाढी कापणार नाही ती नेमकी घटना काय होती हे गुजरात राज्य सहकारी संस्थेचे अध्यक्ष आनंद भाई पटेल यांनी शनिवारी सांगितलं.