AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली देवी पार्वतीची मूर्ती सापडली अमेरिकेत

सीआयडने या मूर्तीचा शोध लावण्यासाठी परदेशातील ऑक्शन हाऊस अर्थात दुर्मिळ वस्तुंचा लिलाव करणारी केंद्रे आणि संग्रहालयांमध्ये चौकशी सुरू केली. या प्रकरणी तपासादरम्यान जगातील विविध संग्रहालयांमधून माहिती देखील घेण्यात आली. बरीच शोधाशोध केल्यानंतर शेवटी न्यूयॉर्कमधील बोनहॅम्स हाऊसमध्ये 50 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली पार्वती देवीची मूर्ती सापडली आहे.

50 वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली देवी पार्वतीची मूर्ती सापडली अमेरिकेत
| Updated on: Aug 09, 2022 | 8:40 PM
Share

चेन्नई : 50 वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली देवी पार्वतीची मूर्ती(Goddess Parvati ) अमेरिकेत( America) सापडली आहे. तामिळनाडूतून 50 वर्षांपूर्वी ही मोर्ती चोरीला गेली होती. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ही मूर्ती सापडली आहे. सीआयडी या मूर्तीचा तपास करत होती. अखेरीस रही मूर्ती शोधण्यात सीआयडीला यश आले आहे. लवकरच ही मूर्ती भारतात आणली जाणार आहे. या मूर्तीची किंमत जवळपास 1,68, 26,143 इतकी आहे.

कुंभकोणम शहरातील थंडाथोट्टम येथील नंदनपुरेश्वर शिवन मंदिरातून 50 वर्षांपूर्वी ही मूर्ती चोरीला गेली होती. न्यूयॉर्कमधील बोनहॅम्स या लिलाव गृहात ही मूर्ती सापडल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दिली आहे. 1971 मध्ये स्थानिक पोलिसांकडे ही मूर्ती चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

1971 मध्ये तक्रार झाल्यानंतर काही वर्षांनी या प्रकरणात काहीच अपडेट समोर आली नाही. यानंतर 2019 मध्ये के. वासूच्या तक्रारीवरून पुन्हा याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. हे प्रकरण प्रलंबित होते. मात्र पोलिस निरीक्षक एम. चित्रा यांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याने सीआयडीचे याकडे लक्ष गेले.

मूर्ती अमेरिकेत सापडली

सीआयडने या मूर्तीचा शोध लावण्यासाठी परदेशातील ऑक्शन हाऊस अर्थात दुर्मिळ वस्तुंचा लिलाव करणारी केंद्रे आणि संग्रहालयांमध्ये चौकशी सुरू केली. या प्रकरणी तपासादरम्यान जगातील विविध संग्रहालयांमधून माहिती देखील घेण्यात आली. बरीच शोधाशोध केल्यानंतर शेवटी न्यूयॉर्कमधील बोनहॅम्स हाऊसमध्ये 50 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली पार्वती देवीची मूर्ती सापडली आहे.

अत्यंत दुर्मिळ मूर्ती

ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ आहे. 12 व्या शतकातील चोल राजवटीत ही मूर्ती बनवण्यात आली असल्याचा संशोधकांचा दावा आहे. या मूर्तीची लांबी 52 सेमी आहे. साधारणपणे देवी पार्वती किंवा उमा माता दक्षिण भारतात उभी असल्याचे दाखवले जाते. ज्यामध्ये मुकुट घातला जातो. तशाच प्रकारची ही मूर्ती आहे.

मूर्ती परत आणण्यासाठी कागद तयार

दक्षिण भारतात, पार्वतीला उमा म्हणूनही पूजले जाते आणि तिची मूर्ती सहसा उभी असते. सीआयडीचे पोलिस अधिकारी जयंत मुरली यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पथकाने ही मूर्ती भारतात परत आणण्यासाठी कागदपत्रे तयार केली आहेत. केंद्रातील मोदी सरकार भारतातून चोरीला गेलेल्या मूर्ती परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

मोदी सरकारने अनेक  मौल्यवान मूर्ती परत आणल्या

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले होते की, 2014 मध्ये त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातून चोरीला गेलेल्या सुमारे 200 मूर्ती परत आणल्या गेल्या आहेत. 2020 मध्ये देखील, ब्रिटनने तामिळनाडूमधील मंदिरातून चोरलेल्या तीन बहुमोल मूर्ती परत केल्या होत्या. गेल्या काही वर्षांत देशात परत आणलेल्या मूर्तींपैकी सर्वात मौल्यवान मूर्ती नटराजाची होती. त्यात भगवान शंकराची नृत्याची प्रतिमा आहे. या मूर्तीची किंमत 40.55 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरीने ही मूर्ती विकत घेतले होती.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.