या ‘पुष्पा’ ची कहाणी तस्कर होण्यापूर्वीच संपली; भैरवसिंग शेखावतने अगोदरच केले कांड, लाल चंदनाची तस्करी अशी फसली
Andhra Pradesh three red Sandalwood Smugglers : तिरुपती टास्क फोर्सने 4.5 कोटी रुपयांचे लाल चंदनाची तस्करी उधळून लावली. पोलिसांनी या 'पुष्पा' ची कहाणी तस्कर होण्यापूर्वीच संपवली. प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली. तर मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.

Red Sanders Smuggling : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती रेड सँडर्स अँटी स्मगलिंग टास्क फोर्सने पुष्पाचा तस्करीपूर्वीच द एंड केला. या टास्क फोर्सने अंतरराज्यीय तस्करी करणाऱ्यांचा अगोदरच भांडफोड केला. 4.5 कोटी रुपयांचे लाल चंदनाची तस्करी उधळून लावली. पोलिसांनी या ‘पुष्पा’ ची कहाणी तस्कर होण्यापूर्वीच संपवली. प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली. तर मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. 22 जानेवारी रोजी गुप्त वार्ता मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
तिरुपति रेड सँडर्स अँटी-स्मगलिंग टास्क फोर्सने नरेंद्र कुमार उर्फ मणि (तामिळनाडु),बिनॉय कुमार भगत (आसाम) आणि विजय जोशी (राजस्थान) या तीन पुष्पांना अटक केली. तर मुख्य आरोपी फरार झाला. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. हे एक मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पुष्पा स्टाईलने करत होते तस्करी




लाल चंदनाच्या लाकडांची तस्करी करण्याची त्यांची पद्धत ही पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन सारखीच होती. पुष्पा चित्रपटातील तस्करीच्या कहाणीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आता या चित्रपटाचा सिक्वल सुद्धा आला आहे. या चित्रपटाच्या कहाणीपासून प्रेरणा घेऊनच तस्करांनी लाल चंदनाची चोरी केली. एका कंटेनर लॉरीमधून लाल चंदनाची वाहतूक करण्यात येत होती. पण त्याची कुणकुण टास्क फोर्सला लागली. जवळपास 7 टन लाल चंदन आसामला नेण्याचा तस्कराचा डाव होता. पण टास्क फोर्सने त्यांच्या या प्लॅनवर पाणी फेरले.
लाल चंदनाचे वैशिष्ट्ये
लाल चंदन, याला रेड सँडर्स असे म्हणतात. आंध्र प्रदेशातील एक नामशेष होण्याच्या मार्गावरील हे झाड आहे. त्याच्या खास लाल रंगामुळे त्याला मोठी मागणी आहे. जागतिक बाजारात विशेषतः चीन आणि जपानमध्ये या लाल चंदनाला विशेष मागणी आहे. त्याचा वापर महागडे वास्तूशिल्प, कलाकृती, लाकडी साहित्य, सामान, संगीत वाद्ययंत्र तसेच इतर कामासाठी करण्यात येतो.
या खास गुणांमुळे त्याला जागतिक बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या वृक्षावर कुऱ्हाड बंदी घालण्यात आली आहे. या तस्करीला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सने कारवाईला गती दिली आहे. या सिंडिकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची या क्षेत्रातील वाहतुकीवर करडी नजर असते.