बाजू ऐकून न घेताच निर्णय दिला, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात देशमुखांची सुप्रीम कोर्टात 290 पानांची याचिका

बाजू ऐकून न घेताच निर्णय दिला, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात देशमुखांची सुप्रीम कोर्टात 290 पानांची याचिका
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी

परमबीर सिंग प्रकरणात उच्च न्यायलयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. (Anil Deshmukh Move Supreme Court Against Bombay HC Order)

भीमराव गवळी

|

Apr 06, 2021 | 5:56 PM

नवी दिल्ली: परमबीर सिंग प्रकरणात उच्च न्यायलयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आपली बाजू ऐकून न घेता कोर्टाने चौकशीचे आदेश दिले असून या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. (Anil Deshmukh Move Supreme Court Against Bombay HC Order)

गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख काल दिल्लीत आले होते. त्यानंतर आज त्यांनी सर्वोच्च न्यायालयात 290 पानांची विशेष अनुमती याचिका दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं. या याचिकेत अनेक महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणात आपली बाजू ऐकून न घेता थेट निर्णय दिला. हा नैसर्गिक न्याय नाही, असं देशमुख यांनी याचिकेत म्हटलं आहे. तसेच सीबीआयला पूर्ववेळ संचालक नसताना सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची घाई का? असा सवालही त्यांनी याचिकेतून केला असून या ग्राऊंडवर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच या याचिकेतून त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.

राज्य सरकारचे आव्हान

दरम्यान, राज्य सरकारनेही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटी रुपये दर महिन्याला वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला होता. त्यावर कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

याचिकेतील महत्वाचे मुद्दे

>> परमबीर सिंग यांच्या लेटरवर सही नव्हती. अश्या कोणत्याही कागदावर सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य का?

>> अनिल देशमुख यांना बोलायची कोणतीही संधी दिली नाही, मला माझी बाजू मांडू देण्यात यावी

>> हायकोर्टाने तक्रार दाखल करावी याबद्दल हस्तक्षेप केला नाही

>> सीबीआयला सध्या पूर्णवेळ संचालक नाही, मग चौकशीची घाई का?

>> महाराष्ट्र पोलिस आणि यंत्रणा यावर विश्वास ठेवला पाहिजे

कॅव्हेट दाखल

याप्रकरणी अ‍ॅड. जयश्री पाटील (Adv Jayashree Patil) यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट (Caveat) दाखल केली आहे. अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता असल्याने जयश्री पाटलांनी कॅव्हेट दाखल केली. आरोपांबाबत 15 दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी सुरु करण्यास हायकोर्टाने सीबीआयला सांगितले आहे. अशा प्रकारे कॅव्हेट दाखल केल्यास भविष्यात येणाऱ्या प्रकरणात पक्षकाराला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. ज्यामुळे दोन्हींकडील बाजू ऐकूनच निकाल दिला जातो. सिव्हिल प्रोसिजर कोड 148 अ च्या अंतर्गत कॅव्हेट फाईल केलं जातं.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अ‍ॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. (Anil Deshmukh Move Supreme Court Against Bombay HC Order)

संबंधित बातम्या:

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

अनिल देशमुखप्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव, अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या, भलेही तुम्ही मोठे मराठा नेते असाल

अ‍ॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी, बोलवता धनी सांगणार, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

(Anil Deshmukh Move Supreme Court Against Bombay HC Order)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें